दिवस पहिला : दिनांक 16 मे या दिवशी पहाटे 4.30 लाच जाग आली. पिण्यासाठी गरम पाणी घ्यावे म्हणून बाहेर पडलो तर पहातो ते काय चंक्क उजाडल होत. आपण देशाच्या पश्चिम टोकाकडून पूर्वेकडील दार्जिलिंगला आलो आहोत आणि येथे सुर्य दोन तास आधी उगवतो तसेच मावळतो हे लक्षात यायला काही शेरलॉक होम्सच्या मेंदूची अवश्यकता नव्हती. सकाळी 6.00 वाजता आम्ही नाश्त्यासाठी हॉटेल मधिल वरच्या गॅलरीत जमलो. तेव्हा धुळेकर डॉ. चिंत्ते यांनी बोट दाखवून खिडकी बाहेर पहायला सांगितले. बाहेर पहातो ते काय अनेकदा लोकांच्या भिंतीवर फ्रेममध्ये पाहिलेल्या आणि मोबाईलवर वॉलपेपर म्हणून म्हणून ठेवलेल्या हिमाच्छादित पर्वत रांगा सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होत्या. हिमालयात स्नो लाईने ही 5700 मिटर्सच्या वर सुरू होते. म्हणजे आम्ही दार्जिलिंगच्या (2024 मीटर) वरुन अंदाजे 6000 मिरच्या वरील पर्वत रांगा पहात होतो. मी माझ्या अयुष्यात पहिल्यांदा हिमाच्छादित पर्वत पहात होतो. इयत्ता नववीत असत्तांना सहलिनिम्मित पहिल्यांदा अलिबागला समुद्र पाहीला होता तेव्हा जे वाटले होते अगदी तसेच आता जाणवले. अशावेळी मोबाईल फोनमध्ये कॅमेरा टाकन्याची आयडिया ज्या व्यक्तीला सुचली त्या महान व्यक्तीला मनोमन धंन्यवाद देउन ते नजारे पटकन टिपून घेतलेत.
नाश्ताकरतां आमच्या ट्रेकचे व्यवस्थापक कलकत्ता येथुन आलेले श्रिमनी सर याच्याशी परिचय झाला. त्यांचा एकंदर व्यक्तिमत्वावरुन हे पुर्वी कुणीतरी खतरु ट्रेकर असले पाहिजेत हे मी ताडले. अधिक चौकशी केल्यावर कळले की ते 1983 सालच्या भारतीय एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी सदस्य होते. एवढा परिचय त्यांची महती समजण्यासाठी पुरेसा होता. नाश्ताकरतां त्यांनी काही महत्त्वाच्या सुचना केल्यात, जसेकी शंक्य तेवढा भात खा, बटाटे खा, भरपूर पाणी प्या इत्यादी ज्यातून तुम्हाला कारबोहायड्रेट्स मिळेल आणि निर्जलिकरण होनार नाही. चहा हा बिनदुधाचा होता हे त्याच्या रंगावरून कळत होते हे पाहून मात्र आमच्या चेहर्यावरचा रंग उडाला. हे श्रिमनीनीं लगेच ओळखले ते म्हणाले Milk is bad for digestion in Mountains, try to drink Tea without milk. (आता त्याना कुठे ठाउक कि धुळ्याच्या गोपाल टि चा पिवर चहा काय असतो ते.)
सकाळी साधारणपणे 6.30 ला आम्ही दार्जिलिंग सोडून जीपने ट्रेक सुरू होनार होता त्या धोत्रे या गावाच्या मार्गाला लागलो. दुपारच्या जीवनाचे डबे वाटेत मिळालेत. दार्जिलिंग मागे पडले तसा रस्ता रहदारीमुक्त आणि सुंदर झाला. आजुबाजुला पसरलेल जंगल अधिक घनदाट झाल. आम्ही खर्या अर्थाने हिमालयाच्या कोअर रिजन मध्ये प्रवेश करत होतो. वळणावळणाच्या रस्त्यावर ड्रायव्हरच कौशल्य दिसत होत. गाड्या सुसाट सुटल्या होत्या. अचानक एका वळणावर गाडिचा वेग मंदावला आणि ड्रायव्हरने आम्हाला खिडकीतून बाहेर पाहण्यासाठी इशारा केला. पहातो तर काय बाहेर बिबटय़ाचि चार लहान पिल्ले एका चढावर चढण्याचा प्रयत्न करत होती. ते द्रुष्य पाहुन आम्ही गारच पडलोत. लोक जे बघण्यासाठी जंगल सफरीवर जातात ते आम्ही सहज रस्त्यावरच्या प्रवासात पहात होतो. हि आहे हिमालयाची महती. पिल्ले होती म्हणजेच त्यांची आई देखिल तिथेच असणार होती. गाडीच्या खिडकीतूनच आम्ही पटकन फोटो घेतलेत आणि वाटेला लागलोत. आपल्याला पुढे काय काय पहायला मिळेल या विचाराने सारेच प्रफुल्लित झाले होते.
दोन तासाचा दमवनारा प्रवास करून आम्ही धोत्रे या तिस पस्तीस घरांच्या गावी येउन पोहचलो. आमच्या सभोवताली ढग वेगाने वाहत होते. मध्येच पावसाची रिपरिप चालली होती. सर्व ट्रेकर्सचा हेडकाऊंट घेऊन काही सुचना देण्यात आल्या आणि सकाळी ठिक 9.30 ला आम्ही जंगलातून जाणारी दगडी पायवाट धरली. आम्हाला लिड करत होता राजन नावाचा तिस वर्षे वयाचा एक स्थानिक गाईड तसेच सर्वात मागे होते निमा, पासन आणि गोपाल हे सामान वाहुन नेणारे पोर्टर आणि जॉय सरकार नावाचा एक बंगाली केअर टेकर.
सुरवातीला नवे ट्रेक सुट घातलेले, गॉगल लावलेले, नवे कोरे ट्रेकिगचे शुज घातलेले नव्या दमाचे ट्रेकर्स अतिशय उत्साहात होते परंतु काही अंतर जातोनजातो तोच पावसाला सुरुवात झाली आणि आमचा वेग ओसरला. आम्ही पटकन रेनकोट, रेनशीट चाढवलेत आणि पायवाटेने चालू लागलो. पावसामुळे कॅमेरा काढता येत नव्हता तेव्हा शंक्य तितके फोटो मोबाईल मध्येच घेत होतो. सुजीत आणि मी सुरवातीपासूनच सर्वात पुढे राजन सोबत चालत होतो. पुढे चालण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला फोटोग्राफीसाठी वेळ मिळतो आणि निर्मनुष्य स्थळ देखिल मिळते शिवाय माणसाच्या गोगांटापासुन अंतर ठेवून चालल्याने प्राणी, पक्षी यांचे आवाज ऐकता येतात आणि चाहूल घेता येते.
आमच्यात आणि इतरात चालतांना बरेच अंतर पडल्याने राजन आम्हाला तिथेच थांबायला सांगुन ईतरांना घेण्यासाठी मागे फिरला. पाऊसही आता थांबला होता आम्ही रेनकोट वैगरे पुन्हा बॅग मधे ठेवलेत आणि कॅमेरा बाहेर काढला. कॅमेऱ्याची लेन्स कुठेही फिरवा तुम्हाला वॉलपेपर इमेज मिळनार एवढ सौंदर्य सभोवताली पसरलेल होत. कुठेही मानवी हस्तक्षेपाचे ठसे नव्हते. पायवाटेने बाजुलाच पडलेला पाचोळ्याचे जाडसर थर होते. पायवाट सोडली तर उघडी जमिन कुठेही नजरेस पडत नव्हती. शक्य तिथे दाटीवाटीने वनस्पती उगविल्या होत्या. काही व्रुक्ष तर भिती वाटावि एवढे प्रचंड मोठे झाले होते. त्यांच्या जाडसर फांद्यांवर शैवाळाचे थर साचले होते. हवेत प्रचंड गारवा होता. नुकत्याच झालेल्या पावसाने रान ओलसर झाल होत. मला अचानक महानोरांच्या ओळी आठवल्यात "चिंब पावसान रान झाल आबादानि, झाकू कशी पाठीवरली चादंनगोदनी बाई, बाई चादंनगोदनी'. संदिप खरेंच्या 'दूर दुर नभपार डोंगराच्या माथ्यावर, निळे निळे गार गार पावसाच्या घरदारातून' आम्ही चंक्क चालत होतो. चालत चालत आम्ही भारत आणि नेपाळ सिमेवर असलेल्या सिंगालिला नॅशनल पार्कच्या बफर झोनमध्ये प्रवेश केला होता.
काही वेळाने सर्वच ट्रेकर्स जमल्यावर एका मोकळ्या माळरानावर आम्ही जेवनासाठी आणि विश्रांतीसाठी थांबलो. कुठलाही आडोसा नसल्याने वाह❓सरप्राइज...
वरणभात, बटाट्याची भाजी आणि तांदळाच्या पुर्या. आम्ही नाक मुरडत जेवण आटोपले आणि पुन्हा एकदा वाटेला लागलो. थोडेच अंतर गेल्यावर जंगल संपल आणि मोकळा परिसर सुरू झाला. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रचंड धुक पडल आणि चालता चालता एका ठिकाणी ओळिने काही झेंडे गाडलेले दिसले. माझ्यातला शेरलॉक होम्स पुन्हा एकदा जागा झाला. आपण भारत आणि नेपाळच्या सिमेवर आहोत हे मी जाहीर करून टाकले जे नंतर चंक्क खरे निघाले. मग काय पासपोर्ट शिवाय आम्ही नेपाळच्या सिमेत प्रवेश केला (कारण तिथे कुठलाही बंदोबस्त नव्हता) आणि सिमेवर मनसोक्त फोटोसेशन करून धुमाकूळ घातला. पहिल्यांदाच अंतराष्टिय सिमा ओलांडतना उगाच उर वैगेरे भरून आले. तिथेच काही अंतरावरच आमचे मुक्कामाचे ठिकाण होते. आज रात्रीचा मुक्काम आम्ही नेपाळ मधिल टंम्बलिग या गावात करणार होतो.
एका तिनमजली लाकडी घरात आमच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यात सर्व पुरष मंडळी सर्वात वरिल झोपडीच्या आकाराच्या एका हॉलमध्ये थांबणार होती. मला ते ठिकाण प्रचंड आवडल रात्री जेवनात पुन्हा एकदा तोच बेत... वरण भात आणि बटाटे.
जेवन आटोपून आम्ही एका हॉलमध्ये बसलो तेव्हा त्या हॉटेल मालकाचा मुलगा गिटार वाजवतो हे आम्हस कळले. मग काय मैफील जमायला कितीसा वेळ लागणार. गिटारच्या पाश्र्वभूमीवर अर्जीत सिंग पासुन सुरु झालेली आमची मैफील भावगीत आणि गझलेच्या वाटेने थेट नेपाळी लोकसंगीतावर येउन थांबली. बाहेर प्रचंड गारवा आणि पाउस असतांना नेपाळ मधिल हिमालयातील त्या लाकडी घरात रंगलेली ती मैफिल सर्वासाठी मर्मबंधातली ठेव बनुन राहीली आहे.
रात्री उशिरा आम्ही झोपलो ते एक सुंदर दिवस संपवून दुसर्या थरारक दिवसाच्या प्रतिक्षेत. कारण उद्या येणार होता आमच्या ट्रेकचा सर्वात लांबचा मार्ग आणि खडतर दिवस....
ता वारा चांगलाच बोचत होता. चालून चालून थकलेल्या आणि सकाळपासून उपाशी असलेल्या सार्यानी वाटेत मिळालेले जेवणाचे डबे उघडलेत आणि गेस व्हाट...नाश्ताकरतां आमच्या ट्रेकचे व्यवस्थापक कलकत्ता येथुन आलेले श्रिमनी सर याच्याशी परिचय झाला. त्यांचा एकंदर व्यक्तिमत्वावरुन हे पुर्वी कुणीतरी खतरु ट्रेकर असले पाहिजेत हे मी ताडले. अधिक चौकशी केल्यावर कळले की ते 1983 सालच्या भारतीय एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी सदस्य होते. एवढा परिचय त्यांची महती समजण्यासाठी पुरेसा होता. नाश्ताकरतां त्यांनी काही महत्त्वाच्या सुचना केल्यात, जसेकी शंक्य तेवढा भात खा, बटाटे खा, भरपूर पाणी प्या इत्यादी ज्यातून तुम्हाला कारबोहायड्रेट्स मिळेल आणि निर्जलिकरण होनार नाही. चहा हा बिनदुधाचा होता हे त्याच्या रंगावरून कळत होते हे पाहून मात्र आमच्या चेहर्यावरचा रंग उडाला. हे श्रिमनीनीं लगेच ओळखले ते म्हणाले Milk is bad for digestion in Mountains, try to drink Tea without milk. (आता त्याना कुठे ठाउक कि धुळ्याच्या गोपाल टि चा पिवर चहा काय असतो ते.)
सकाळी साधारणपणे 6.30 ला आम्ही दार्जिलिंग सोडून जीपने ट्रेक सुरू होनार होता त्या धोत्रे या गावाच्या मार्गाला लागलो. दुपारच्या जीवनाचे डबे वाटेत मिळालेत. दार्जिलिंग मागे पडले तसा रस्ता रहदारीमुक्त आणि सुंदर झाला. आजुबाजुला पसरलेल जंगल अधिक घनदाट झाल. आम्ही खर्या अर्थाने हिमालयाच्या कोअर रिजन मध्ये प्रवेश करत होतो. वळणावळणाच्या रस्त्यावर ड्रायव्हरच कौशल्य दिसत होत. गाड्या सुसाट सुटल्या होत्या. अचानक एका वळणावर गाडिचा वेग मंदावला आणि ड्रायव्हरने आम्हाला खिडकीतून बाहेर पाहण्यासाठी इशारा केला. पहातो तर काय बाहेर बिबटय़ाचि चार लहान पिल्ले एका चढावर चढण्याचा प्रयत्न करत होती. ते द्रुष्य पाहुन आम्ही गारच पडलोत. लोक जे बघण्यासाठी जंगल सफरीवर जातात ते आम्ही सहज रस्त्यावरच्या प्रवासात पहात होतो. हि आहे हिमालयाची महती. पिल्ले होती म्हणजेच त्यांची आई देखिल तिथेच असणार होती. गाडीच्या खिडकीतूनच आम्ही पटकन फोटो घेतलेत आणि वाटेला लागलोत. आपल्याला पुढे काय काय पहायला मिळेल या विचाराने सारेच प्रफुल्लित झाले होते.
दोन तासाचा दमवनारा प्रवास करून आम्ही धोत्रे या तिस पस्तीस घरांच्या गावी येउन पोहचलो. आमच्या सभोवताली ढग वेगाने वाहत होते. मध्येच पावसाची रिपरिप चालली होती. सर्व ट्रेकर्सचा हेडकाऊंट घेऊन काही सुचना देण्यात आल्या आणि सकाळी ठिक 9.30 ला आम्ही जंगलातून जाणारी दगडी पायवाट धरली. आम्हाला लिड करत होता राजन नावाचा तिस वर्षे वयाचा एक स्थानिक गाईड तसेच सर्वात मागे होते निमा, पासन आणि गोपाल हे सामान वाहुन नेणारे पोर्टर आणि जॉय सरकार नावाचा एक बंगाली केअर टेकर.
सुरवातीला नवे ट्रेक सुट घातलेले, गॉगल लावलेले, नवे कोरे ट्रेकिगचे शुज घातलेले नव्या दमाचे ट्रेकर्स अतिशय उत्साहात होते परंतु काही अंतर जातोनजातो तोच पावसाला सुरुवात झाली आणि आमचा वेग ओसरला. आम्ही पटकन रेनकोट, रेनशीट चाढवलेत आणि पायवाटेने चालू लागलो. पावसामुळे कॅमेरा काढता येत नव्हता तेव्हा शंक्य तितके फोटो मोबाईल मध्येच घेत होतो. सुजीत आणि मी सुरवातीपासूनच सर्वात पुढे राजन सोबत चालत होतो. पुढे चालण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला फोटोग्राफीसाठी वेळ मिळतो आणि निर्मनुष्य स्थळ देखिल मिळते शिवाय माणसाच्या गोगांटापासुन अंतर ठेवून चालल्याने प्राणी, पक्षी यांचे आवाज ऐकता येतात आणि चाहूल घेता येते.
आमच्यात आणि इतरात चालतांना बरेच अंतर पडल्याने राजन आम्हाला तिथेच थांबायला सांगुन ईतरांना घेण्यासाठी मागे फिरला. पाऊसही आता थांबला होता आम्ही रेनकोट वैगरे पुन्हा बॅग मधे ठेवलेत आणि कॅमेरा बाहेर काढला. कॅमेऱ्याची लेन्स कुठेही फिरवा तुम्हाला वॉलपेपर इमेज मिळनार एवढ सौंदर्य सभोवताली पसरलेल होत. कुठेही मानवी हस्तक्षेपाचे ठसे नव्हते. पायवाटेने बाजुलाच पडलेला पाचोळ्याचे जाडसर थर होते. पायवाट सोडली तर उघडी जमिन कुठेही नजरेस पडत नव्हती. शक्य तिथे दाटीवाटीने वनस्पती उगविल्या होत्या. काही व्रुक्ष तर भिती वाटावि एवढे प्रचंड मोठे झाले होते. त्यांच्या जाडसर फांद्यांवर शैवाळाचे थर साचले होते. हवेत प्रचंड गारवा होता. नुकत्याच झालेल्या पावसाने रान ओलसर झाल होत. मला अचानक महानोरांच्या ओळी आठवल्यात "चिंब पावसान रान झाल आबादानि, झाकू कशी पाठीवरली चादंनगोदनी बाई, बाई चादंनगोदनी'. संदिप खरेंच्या 'दूर दुर नभपार डोंगराच्या माथ्यावर, निळे निळे गार गार पावसाच्या घरदारातून' आम्ही चंक्क चालत होतो. चालत चालत आम्ही भारत आणि नेपाळ सिमेवर असलेल्या सिंगालिला नॅशनल पार्कच्या बफर झोनमध्ये प्रवेश केला होता.
काही वेळाने सर्वच ट्रेकर्स जमल्यावर एका मोकळ्या माळरानावर आम्ही जेवनासाठी आणि विश्रांतीसाठी थांबलो. कुठलाही आडोसा नसल्याने वाह❓सरप्राइज...
वरणभात, बटाट्याची भाजी आणि तांदळाच्या पुर्या. आम्ही नाक मुरडत जेवण आटोपले आणि पुन्हा एकदा वाटेला लागलो. थोडेच अंतर गेल्यावर जंगल संपल आणि मोकळा परिसर सुरू झाला. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रचंड धुक पडल आणि चालता चालता एका ठिकाणी ओळिने काही झेंडे गाडलेले दिसले. माझ्यातला शेरलॉक होम्स पुन्हा एकदा जागा झाला. आपण भारत आणि नेपाळच्या सिमेवर आहोत हे मी जाहीर करून टाकले जे नंतर चंक्क खरे निघाले. मग काय पासपोर्ट शिवाय आम्ही नेपाळच्या सिमेत प्रवेश केला (कारण तिथे कुठलाही बंदोबस्त नव्हता) आणि सिमेवर मनसोक्त फोटोसेशन करून धुमाकूळ घातला. पहिल्यांदाच अंतराष्टिय सिमा ओलांडतना उगाच उर वैगेरे भरून आले. तिथेच काही अंतरावरच आमचे मुक्कामाचे ठिकाण होते. आज रात्रीचा मुक्काम आम्ही नेपाळ मधिल टंम्बलिग या गावात करणार होतो.
एका तिनमजली लाकडी घरात आमच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यात सर्व पुरष मंडळी सर्वात वरिल झोपडीच्या आकाराच्या एका हॉलमध्ये थांबणार होती. मला ते ठिकाण प्रचंड आवडल रात्री जेवनात पुन्हा एकदा तोच बेत... वरण भात आणि बटाटे.
जेवन आटोपून आम्ही एका हॉलमध्ये बसलो तेव्हा त्या हॉटेल मालकाचा मुलगा गिटार वाजवतो हे आम्हस कळले. मग काय मैफील जमायला कितीसा वेळ लागणार. गिटारच्या पाश्र्वभूमीवर अर्जीत सिंग पासुन सुरु झालेली आमची मैफील भावगीत आणि गझलेच्या वाटेने थेट नेपाळी लोकसंगीतावर येउन थांबली. बाहेर प्रचंड गारवा आणि पाउस असतांना नेपाळ मधिल हिमालयातील त्या लाकडी घरात रंगलेली ती मैफिल सर्वासाठी मर्मबंधातली ठेव बनुन राहीली आहे.
रात्री उशिरा आम्ही झोपलो ते एक सुंदर दिवस संपवून दुसर्या थरारक दिवसाच्या प्रतिक्षेत. कारण उद्या येणार होता आमच्या ट्रेकचा सर्वात लांबचा मार्ग आणि खडतर दिवस....
*To be continued...*
No comments:
Post a Comment