मानवी सभ्यतेच्या इतिहासातील सर्वात असंभ्य घटना म्हणून दुसर्या महायुद्धाचा उल्लेख केला जातो. 1939 ते 1945 दरम्यान लढल्या गेलेल्या या युद्धात सहा कोटींहून अधिक लोक मारले गेले होते. जगाचा इतिहास, भूगोल, अर्थकारण, राजकारण, समाजकारण बदलून टाकणार्या या घटनेचा कलाक्षेत्रावर प्रचंड प्रभाव पहायला मिळतो. कुठल्याही संवेदनशील कलाकारास हलवुन टाकणार्या या घटनेचे पडसाद साहित्य, चित्रकला, चित्रपट, नाटक या कलामांध्यमातून आजपर्यंत उमटत आलेले आपल्याला आढळतात. या लेखामालेतून दुसर्या महायुद्धावर आधारित काही लक्षवेधी चित्रपटांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण करनार आहोत.
*महायुद्धाच्या चित्रक्रूती भाग एक - शिंडलर्स लिस्ट*
जागतीक सिनेमातल आजच्या घडिच सर्वात महत्वाच नाव कुठल असा प्रश्न विचारला गेला तर बहुतेकांच उत्तर असेल 'स्टीव्हन स्पिलबर्ग'. गेल्या पाच दशकांपासून या प्रतिभावान दिग्दर्शकाने जागतिक सिनेमावर आपल निर्विवाद वर्चस्व गाजवल आहे. स्पिलबर्ग हा कुठल्याही पठडीतला दिग्दर्शक नाही. त्याला क्लासिक फिल्म मेकर म्हणाव तर त्याने गल्लाभरू 'इंडियाना जोन्स' आणि 'ज्युरासीक पार्क' सारखे सिनेमा बनवले आहेत. त्याला सायन्स फिक्शनवाला दिग्दर्शक म्हणाव तर त्याचे 'म्युनिच' आणि 'लिंकन' सारखे वास्तववादी सिनेमा हा भ्रम मोडून काढतात. त्याला लार्जर दॅन लाइफ चित्रपटांचा बादशहा म्हणाव तर 'द टर्मिनल' सारखा साधा, सरळ, सुंदर चित्रपटही त्याने बनविला आहे. थोडक्यात स्पिलबर्ग हा प्रचंड मोठी रेंज असलेला तल्लख बुद्धीचा प्रतिभावान दिग्दर्शक आहे. एकाच वेळी त्याच्या कलाकृती या व्यावसायिक असतात आणि प्रायोगिक सुद्धा. अशा या महान दिग्दर्शकाचा सगळ्यात महत्वाचा सिनेमा म्हणून 'शिंडलर्स लिस्ट' या चित्रपटाच नाव घेतले जाते.
दुसर्या महायुद्धात नाझी सैनिकांनी वंशद्वेशाच्या विखारी विचारातून जर्मनीतील ज्यू नागरिकांच मोठ्या प्रमाणात शिरकाण केल होत. ज्यू लोकांना संपविण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध अशा छळछावण्याची निर्मिती केली गेली. काही फार थोडे सुदैवी ज्यू कैदी या छावण्यातून वाचले होते. 'शिंडलर्स लिस्ट' हा चित्रपट नाझी छळछावण्यातून अतिशय रोमहर्षक पद्धतीने वाचविण्यात आलेल्या काही ज्यू कैद्यांची कथा सागनांरा चित्रपट आहे जो बेतलेला आहे 'आॉस्कर शिंडलर्स' या मुळच्या जर्मन व्यापाऱ्याच्या औदार्यच्या, करूणेच्या आणि माणसांचे प्राण वाचविण्यात आपल सर्वस्व गमावन्यासाठी तयार होणार्या मानसिकतेच्या प्रवासावर. या चित्रपटाचा दिग्दर्शक स्पीलबर्ग स्वतः जन्माने ज्यू असल्याने कदाचित ज्यू लोकांच्या जगण्यातली अगतिकता तो प्रभावीपणे दाखवू शकला असेल.
'शिंडलर्स लिस्ट' हा चित्रपट बेतलेला आहे तो लेखक 'थॉमस केनेली' लिखित 'शिंडलर्स आर्क' या 1982 सालच्या बुकर पारितोषिक विजेत्या कादंबरीवर. 30 नोव्हेंबर 1993 या दिवशी हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित झाला आणि काही समीक्षकांनी हॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात श्रेष्ठ चित्रपट हा किताबच या चित्रपटाला देउन टाकला. 1994 सालच्या आॉस्कर पुरस्कारातील तब्बल सहा पुरस्कार या चित्रपटाने आपल्या नावे केलेत.
1960 सालानंतर ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांचा काळ संपुन रंगीत चित्रपटांचा काळ सुरू झाला परंतु स्पिलबर्ग याने हा संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट माध्यमातूनच चित्रीत केला आहे. हे माध्यम चित्रपटाचा काळ अधिक प्रभावीपणे उभे करते आणि ब्लॅक अँड व्हाईट हे रंग प्रातिनिधिक स्वरूपात चित्रपटातल्या दोन व्यक्तिरेखा प्रभावीपणे उभ्या करतात. त्यातल्या एक 'आॉस्कर शिंडलर्स' (लियन निसन) हा सर्वस्व गमाउन ज्यू नागरिकांचे प्राण वाचवणारा व्यापारी तर दुसरा ज्यू नागरिकांना हाल हाल करून मारणारा क्रूरकर्मा जर्मन कमांडर 'अमन गोयथ' (राल्फ फिनेस). या दोघही कसदार अभिनेत्याचा सोबत महात्मा गांधींच्या भूमिकेसाठी आॉस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या 'बेन किंग्जले' याने 'आयझॅक स्टर्न' या अंत्यत सेवाभावी आणि सोशिक ज्यू व्यक्तीची भुमिका प्रभावीपणे साकारली आहे.
दुसरे महायुद्ध हे जरी जगावर आर्थिक आरिष्ट्य घेऊन आले तरी ती अनेक भाडवलखोरांसाठी प्रचंड नफा कमावण्यासाठीची एक संधी होती. हिच संधी साधण्यासाठी 'आॉस्कर शिंडलर्स' हा विषयासक्त, व्यसनी, स्वच्छंदी नफेखोर एक भांड्याची फॅक्टरी निर्माण करण्याचा निर्णय घेतो कारण त्या फॅक्टरीत राबण्यासाठी त्याला नाममात्र दराने ज्यू कैदी उपलब्ध असतात. सोबतीला हवी ती सवलत प्राप्त करून घेण्यासाठी सोबत असते ती जर्मन कमांडर 'अमन गोयथ' याची परंतु हळू हळू ज्यू नागरिकांवर होणारा अनन्वित अत्याचार पाहून 'आॉस्कर शिंडलर्स' मधला माणूस जागा होत जातो. सुरवातीला नाझी विचारसरणीचा पुरस्कर्ता हा व्यापारी किड्यामुग्यांसारख माणसाना मरतांना पाहून प्रचंड अस्वस्थ होतो आणि 1100 ज्यू नागरिकांना वाचविण्यासाठी आपली सर्व संपत्ती गमावतो.'एडगर रॅमिरेस' या पत्रकार अभिनेत्याच एक सुंदर वाक्य आहे. "For me no ideological or political convection would justify the sacrifice of human life. The value of human life is absolute with no concession. it's not negotiable." आॉस्कर शिंडलर्स पुर्णपणे या मानसिकतेचा पाईक होतो आणि हेच मानविमुल्य या चित्रपटाचा गाभा आहे.
दुसरीकडे 'अमन गोयथ' हा जर्मन कमांडर निव्वळ वेळ जात नाही म्हणून देखील आपापल्या कामात व्यस्त ज्यू नागरिकांना बंदुकीचा नेम धरून ठार मारण्याची मानसिकता बाळगनारा असतो. या कमांडर मधली माणुसकी जगन्याचा केविलवाणा प्रयत्न करते परंतु ज्यू बंद्दलचा कमालीचा द्वेष त्या माणुसकीला अधिक वाढू देत नाही.
चित्रपटातील काही प्रसंग भयानकपणे अंगावर येतात. खासकरुन 1943 मधे गोयथ हा गेटो या शहरात जमलेल्या हजारो ज्यूंच शिरकाण करण्यचा आदेश देतो. शिंडलर्स उंच टेकडीवरून आपल्या मैत्रीणीसोबत हा प्रसंग पहात असतो. कुत्र्यांच भुंकण, सैरावैरा धावणारे, तळघरात, माळावर लपलेले ज्यू महिला, बालक, पुरुष आणि त्यांना टिपून मारणारे नाझी सैनिक. या सर्व धावपळीत संपूर्ण ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटात ताबुंस रंगाचा झगा घालून धावणारी चिमुकली आणि हा नरसंहार संपतो तेव्हा एका गाडीतील प्रेताच्या ढिगातून डोकावनारा तो तांबूस रंगाचा झगा.
असाच एक प्रसंग चित्रपटाच्या शेवटी येतो जेव्हा ज्यू महिलांना घेऊन जाणारी एक आगगाडी रस्ता चुकून बर्फाळ प्रदेशातील एका छळछावणित पोहचते. जेथून धुरांचे प्रचंड काळे लोट बाहेर पडत असतात. तिथे पोहोचताच सगळ्या स्त्रियांचे केस कापले जातात आणि नग्न अवस्थेत एका मोठ्या कंपार्टमेंटमधे त्यांना सोडले जाते. आता आपल्याला गॅस चेंबरमध्ये नेऊन मारणार हा अंदाज आलेल्या केविलवाण्या स्त्रिया मोठमोठ्याने ओरडत असतात एकदुसरीला बिलगत असतात आणि अशातच विज जाऊन काळोख होतो. काही क्षण रक्त गोठवनारी शांतता पसरते आणि अचानक विषारी गॅस येनार अशि भिती असलेल्या स्त्रियांवर पाण्याचा फवारा येउन बरसतो. म्रूत्यू च्या तोंडातून त्या स्त्रीया परतलेल्या असतात कारण तिथे आॉस्कर शिंडलर्स पोहोचलेला असतो आणि नाझी सैनिकांवर त्वेषाने ओरडत असतो "They are my people... They are my people..." पहाणार्याचा काळजाचा ठोका चुकवनारे असे प्रसंग हि स्पिलबर्गच्या चित्रपटांची खासियत आहे..
हा संपूर्ण चित्रपट प्रेक्षक एक प्रकारची अस्वस्थता घेऊन पाहत असतात आणि हि अस्वस्थता चित्रपट संपल्यावरही संपत नाही आणि इथेच चित्रपट यशस्वी ठरतो. चित्रपटाचे शिर्षक 'शिंडलर्स लिस्ट' म्हणजे आॉस्कर शिंडलर्स आणि आयझॅक स्टर्न यानी मिळुन तयार केलेली ज्या ज्यू चे कामगार म्हणून नियुक्ती करून प्राण वाचवायचे आहेत ती यादी आहे. या यादीत नाव असन म्हनजे जगन आणि नसन म्हणजे मरण एवढ महत्त्व ज्यू नागरिकांना या यादिचे आहे. 'शिंडलर्स लिस्ट' हा चित्रपट अंतरिक हाकेला साद घालून माणसाच्या सहजप्रेरणेने जगण्याची गोष्ट आहे. युद्ध आणि शांती, द्वेष आणि प्रेम, क्रैय आणि करूना यांच्यातील युगानुयुगे चालत आलेल्या संघर्षाची गोष्ट सागनांरा आवर्जुन पहावा असा चित्रपट म्हणजे
*शिंडलर्स लिस्ट*दुसर्या महायुद्धात नाझी सैनिकांनी वंशद्वेशाच्या विखारी विचारातून जर्मनीतील ज्यू नागरिकांच मोठ्या प्रमाणात शिरकाण केल होत. ज्यू लोकांना संपविण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध अशा छळछावण्याची निर्मिती केली गेली. काही फार थोडे सुदैवी ज्यू कैदी या छावण्यातून वाचले होते. 'शिंडलर्स लिस्ट' हा चित्रपट नाझी छळछावण्यातून अतिशय रोमहर्षक पद्धतीने वाचविण्यात आलेल्या काही ज्यू कैद्यांची कथा सागनांरा चित्रपट आहे जो बेतलेला आहे 'आॉस्कर शिंडलर्स' या मुळच्या जर्मन व्यापाऱ्याच्या औदार्यच्या, करूणेच्या आणि माणसांचे प्राण वाचविण्यात आपल सर्वस्व गमावन्यासाठी तयार होणार्या मानसिकतेच्या प्रवासावर. या चित्रपटाचा दिग्दर्शक स्पीलबर्ग स्वतः जन्माने ज्यू असल्याने कदाचित ज्यू लोकांच्या जगण्यातली अगतिकता तो प्रभावीपणे दाखवू शकला असेल.
'शिंडलर्स लिस्ट' हा चित्रपट बेतलेला आहे तो लेखक 'थॉमस केनेली' लिखित 'शिंडलर्स आर्क' या 1982 सालच्या बुकर पारितोषिक विजेत्या कादंबरीवर. 30 नोव्हेंबर 1993 या दिवशी हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित झाला आणि काही समीक्षकांनी हॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात श्रेष्ठ चित्रपट हा किताबच या चित्रपटाला देउन टाकला. 1994 सालच्या आॉस्कर पुरस्कारातील तब्बल सहा पुरस्कार या चित्रपटाने आपल्या नावे केलेत.
1960 सालानंतर ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांचा काळ संपुन रंगीत चित्रपटांचा काळ सुरू झाला परंतु स्पिलबर्ग याने हा संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट माध्यमातूनच चित्रीत केला आहे. हे माध्यम चित्रपटाचा काळ अधिक प्रभावीपणे उभे करते आणि ब्लॅक अँड व्हाईट हे रंग प्रातिनिधिक स्वरूपात चित्रपटातल्या दोन व्यक्तिरेखा प्रभावीपणे उभ्या करतात. त्यातल्या एक 'आॉस्कर शिंडलर्स' (लियन निसन) हा सर्वस्व गमाउन ज्यू नागरिकांचे प्राण वाचवणारा व्यापारी तर दुसरा ज्यू नागरिकांना हाल हाल करून मारणारा क्रूरकर्मा जर्मन कमांडर 'अमन गोयथ' (राल्फ फिनेस). या दोघही कसदार अभिनेत्याचा सोबत महात्मा गांधींच्या भूमिकेसाठी आॉस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या 'बेन किंग्जले' याने 'आयझॅक स्टर्न' या अंत्यत सेवाभावी आणि सोशिक ज्यू व्यक्तीची भुमिका प्रभावीपणे साकारली आहे.
दुसरे महायुद्ध हे जरी जगावर आर्थिक आरिष्ट्य घेऊन आले तरी ती अनेक भाडवलखोरांसाठी प्रचंड नफा कमावण्यासाठीची एक संधी होती. हिच संधी साधण्यासाठी 'आॉस्कर शिंडलर्स' हा विषयासक्त, व्यसनी, स्वच्छंदी नफेखोर एक भांड्याची फॅक्टरी निर्माण करण्याचा निर्णय घेतो कारण त्या फॅक्टरीत राबण्यासाठी त्याला नाममात्र दराने ज्यू कैदी उपलब्ध असतात. सोबतीला हवी ती सवलत प्राप्त करून घेण्यासाठी सोबत असते ती जर्मन कमांडर 'अमन गोयथ' याची परंतु हळू हळू ज्यू नागरिकांवर होणारा अनन्वित अत्याचार पाहून 'आॉस्कर शिंडलर्स' मधला माणूस जागा होत जातो. सुरवातीला नाझी विचारसरणीचा पुरस्कर्ता हा व्यापारी किड्यामुग्यांसारख माणसाना मरतांना पाहून प्रचंड अस्वस्थ होतो आणि 1100 ज्यू नागरिकांना वाचविण्यासाठी आपली सर्व संपत्ती गमावतो.'एडगर रॅमिरेस' या पत्रकार अभिनेत्याच एक सुंदर वाक्य आहे. "For me no ideological or political convection would justify the sacrifice of human life. The value of human life is absolute with no concession. it's not negotiable." आॉस्कर शिंडलर्स पुर्णपणे या मानसिकतेचा पाईक होतो आणि हेच मानविमुल्य या चित्रपटाचा गाभा आहे.
दुसरीकडे 'अमन गोयथ' हा जर्मन कमांडर निव्वळ वेळ जात नाही म्हणून देखील आपापल्या कामात व्यस्त ज्यू नागरिकांना बंदुकीचा नेम धरून ठार मारण्याची मानसिकता बाळगनारा असतो. या कमांडर मधली माणुसकी जगन्याचा केविलवाणा प्रयत्न करते परंतु ज्यू बंद्दलचा कमालीचा द्वेष त्या माणुसकीला अधिक वाढू देत नाही.
चित्रपटातील काही प्रसंग भयानकपणे अंगावर येतात. खासकरुन 1943 मधे गोयथ हा गेटो या शहरात जमलेल्या हजारो ज्यूंच शिरकाण करण्यचा आदेश देतो. शिंडलर्स उंच टेकडीवरून आपल्या मैत्रीणीसोबत हा प्रसंग पहात असतो. कुत्र्यांच भुंकण, सैरावैरा धावणारे, तळघरात, माळावर लपलेले ज्यू महिला, बालक, पुरुष आणि त्यांना टिपून मारणारे नाझी सैनिक. या सर्व धावपळीत संपूर्ण ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटात ताबुंस रंगाचा झगा घालून धावणारी चिमुकली आणि हा नरसंहार संपतो तेव्हा एका गाडीतील प्रेताच्या ढिगातून डोकावनारा तो तांबूस रंगाचा झगा.
असाच एक प्रसंग चित्रपटाच्या शेवटी येतो जेव्हा ज्यू महिलांना घेऊन जाणारी एक आगगाडी रस्ता चुकून बर्फाळ प्रदेशातील एका छळछावणित पोहचते. जेथून धुरांचे प्रचंड काळे लोट बाहेर पडत असतात. तिथे पोहोचताच सगळ्या स्त्रियांचे केस कापले जातात आणि नग्न अवस्थेत एका मोठ्या कंपार्टमेंटमधे त्यांना सोडले जाते. आता आपल्याला गॅस चेंबरमध्ये नेऊन मारणार हा अंदाज आलेल्या केविलवाण्या स्त्रिया मोठमोठ्याने ओरडत असतात एकदुसरीला बिलगत असतात आणि अशातच विज जाऊन काळोख होतो. काही क्षण रक्त गोठवनारी शांतता पसरते आणि अचानक विषारी गॅस येनार अशि भिती असलेल्या स्त्रियांवर पाण्याचा फवारा येउन बरसतो. म्रूत्यू च्या तोंडातून त्या स्त्रीया परतलेल्या असतात कारण तिथे आॉस्कर शिंडलर्स पोहोचलेला असतो आणि नाझी सैनिकांवर त्वेषाने ओरडत असतो "They are my people... They are my people..." पहाणार्याचा काळजाचा ठोका चुकवनारे असे प्रसंग हि स्पिलबर्गच्या चित्रपटांची खासियत आहे..
हा संपूर्ण चित्रपट प्रेक्षक एक प्रकारची अस्वस्थता घेऊन पाहत असतात आणि हि अस्वस्थता चित्रपट संपल्यावरही संपत नाही आणि इथेच चित्रपट यशस्वी ठरतो. चित्रपटाचे शिर्षक 'शिंडलर्स लिस्ट' म्हणजे आॉस्कर शिंडलर्स आणि आयझॅक स्टर्न यानी मिळुन तयार केलेली ज्या ज्यू चे कामगार म्हणून नियुक्ती करून प्राण वाचवायचे आहेत ती यादी आहे. या यादीत नाव असन म्हनजे जगन आणि नसन म्हणजे मरण एवढ महत्त्व ज्यू नागरिकांना या यादिचे आहे. 'शिंडलर्स लिस्ट' हा चित्रपट अंतरिक हाकेला साद घालून माणसाच्या सहजप्रेरणेने जगण्याची गोष्ट आहे. युद्ध आणि शांती, द्वेष आणि प्रेम, क्रैय आणि करूना यांच्यातील युगानुयुगे चालत आलेल्या संघर्षाची गोष्ट सागनांरा आवर्जुन पहावा असा चित्रपट म्हणजे
संकल्पना : विनय पाटिल,, धुळे
No comments:
Post a Comment