Friday 23 November 2018

इन्सान खतरे मे है...

    लेखन : विनय पाटील
तुम्ही राजश्री प्रोडक्शन चे गीत  गाता चल, हम आपके है कोण, हम साथ साथ है, विवाह हे सिनिमे  पहिले असतील  तर
त्यात एकसारखे कथानक तुम्हाला दिसेल. संपूर्ण चित्रपटात अतिशय आनंदच वातावरण असत, सारखे कुठले न कुठले सोहळे साजरे होत असतात, एखाददुसर पात्र आणि अप्रिय घटना वगळता सारेच प्रेम आणि संस्कारांची मूर्तिमंत उदाहरण असतात. आणि चित्रपटातील ती अप्रिय घटना अतिशय थोड्या प्रयत्नाने दूर होते आणि शेवट पुन्हा गोड होतो. या चित्रपटांचा गोडवा एवढा असतो कि आपल्याला डायबेटिस होतो की काय अशी शंका यावी. या सर्वांची  आठवण मला हल्ली भारतीय टेलिव्हिजण मीडियावरील बातम्या पाहून येते आहे. गेल्या चार वर्षात भारतीय टेलिव्हिजण मीडियात विद्यमान सरकार संबंधातील बातम्या पाहून असे वाटते कि आपण कुठला राजश्री प्रोडक्शनचा चित्रपट तर पाहत नाहीत. सार काही एवढे आलबेल आहे कि समोरची बातम्या सांगणारी व्यक्ती हि पत्रकार किंवा निवेदक आहे कि केंद्र सरकारचा कुणी प्रवक्ता बोलतो आहे अशी शंका यावी.
   आपल्या अवतीभवती अशी अनेक माणसे असतात कि जी स्थानिक , राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय मुदयावंर आपल्याला तावातावाने चर्चा करताना आढळतात. यातली बहुतेक सर्व मंडळी हि आपली मते हि मुख्यत्त्वे न्युज चॅनेल्स वरील बातम्या पाहून बनवत असते. जर शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा ज्या पाण्याच्या टाकीत पाणी साचवते तेच पाणी दूषित असेल तर घराघरात पोहोचणारे ते पाणी पिऊन लोक आजारी पडणारच. न्युज चॅनेल्स च्या बातम्या अगदी एकांगी असल्याने त्या बघून तयार होणारी मते देखील पांगळी  असतात आणि अशी पांगळी मते घेऊन जगणाऱ्या जनतेला आणि त्या जनतेतल्या तथाकथित नेत्यांना बौद्धिक पगळेपण आल्याशिवाय कसे राहील. याचीच प्रचिती आपण सद्याचा विधानसभेच्या अधिवेशनात पाहत आहोत. मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात तिसऱ्यांदा दुष्काळ पडला आहे. शेतीसाठी सोडाच परंतु बहुतेक गावात ऑक्टोबर महिन्यापासूनच पिण्यासाठी पाणी नाही अशा बिकट परिस्थितीत विधानसभा हि आरक्षणाच्या मुद्यावरून गाजते आहे कारण त्या मुद्यात सरकारसाठी आणि विरोधीपक्षांसाठी सत्तेची गणित दडलेली आहेत तार माध्यमांसाठी दडलेला आहे मसाला.
     काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक सारी चॅनेल्स मंदिर मास्जिद्द वाद, संस्कृती रक्षण, राष्ट्रीय सुरक्षा इत्यादी मुद्द्यांवर चर्चा सत्र घडवून आणतात. खेडे गावात किंवा शहरातल्या चाळीतून विलुप्त होत जाणारी कचाकचा भांडण्याची कला जोपासण्याचे संस्कृती रक्षणाचे काम हे न्युज चॅनेल्स मोट्या इमानदारीने करतं आहेत. त्यामानाने शिक्षणाचा खालावलेला दर्जा, महाग होत जाणाऱ्या आरोग्य सेवा, शेतकरी वर्गाची ढासळत  जाणारी परिस्थिती, बेरोजगारी यांसारखे प्रश्न त्यांच्या खिजगणतीतही नाही. कारण अशा मुद्यात मसाला नाही, त्या चर्चा बघणारा प्रेक्षक कुठल्याच बाजूचा नसतो. त्यामुळे त्याला माहिती मिळते परंतु त्याचा मनोरंजन होत नाही. त्यातून टी आर पी मिळत नाही. प्रेक्षकाना जे आवडते ते देण्याची वृत्ती या न्युज चॅनेलला मसाला चॅनेल बनविते, बिग बॉस के घर मे क्या हुवा , कपिल के किस्से , किंवा रिऍलिटी चेक याना आपण न्युज म्हणू शकतो का आणि मग प्रेक्षकही न्युज चॅनेल्स हि मनोरंजन म्हणूं पाहतात आणि त्यालाच बातम्या समजतात.
      मीडियाला खासकरून टेलिव्हिजण मीडियाला आपले स्वतःचे एक अर्थकारण आहे आणि जे चोवीस तास चालणाऱ्या चॅनेलसाठी कठीण होऊ पाहत आहेत हे जरी मान्य केले तरी. हि माध्यमे लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ आहेत. सरकारी योजनां, त्यांचं कामकाजाचे आणि अंमलबजावणीचे तटस्थ विश्लेषन करण आणि त्यातून जनतेसमोर नेमकी बातमी ठेवणे हे या माध्यमाचा मुख्य कामात मोडते. हे देखील तेवढेच खरे आहे. एखाद्या विद्यार्थ्यांचे त्याचा शिक्षकांसोबत चांगले संबंध असू शाकतात. परंतु चांगला अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षा देणे हे त्या विद्यार्त्याचे प्रथम कर्तव्य असायला हवे. केवळ आपल्या ओळखीच्या जोरावर विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेत अवघड वाटणारे प्रश्नच टाकू नये यासाठी  दबाव टाकला आणि शिक्षकानेहि अगदी तसेच केले तर. कदाचित तो विद्याथी परीक्षेत चांगले गुण मिळवून हुशार भासू शेकेल परंतु तो हुशार असेलच असे नाही. इतर (मॅनेज न होणाऱ्या) शिक्षकांनी त्याला थोडा देखील कठीण प्रश्न  विचारला तर त्या विद्यार्थ्यांची फजिती होईल. भारतातील विद्यमान सरकार आणि त्यांची बाजू मांडणारा पक्ष या विद्यार्थ्यांसारखा झाला आहे. हे विद्यार्थी एवढे मुजोर आहेत कि तुमचा प्रश्नच कसा चुकीचा आहे हे प्रश्न विचारणाऱ्याला ठणकावून सांगतात. अर्थात असले मुजोर विद्यारथी २०१४ पूर्वीही होते. दीर्घकाळच्या सत्तेतून  आलेला माज आणि मुजोरी याचे जिवंत उदाहरण असेलेले कपिल सिब्बल यांसारखे नेते देशाने यापूर्वीही अनुभवले आहेत आणी त्यातूनच २०१४ चे रामायण घडले आहे. परंतु यावेळी हि मुजोरी प्रश्न विचारणारी प्रणालीच मोडून टाकण्यापर्यंत गेली आहे.
     जे कुणे या प्रकारात समाविष्ट होण्यासाठी नकार देतात त्यांच्यवर शक्य त्याप्रकारे दबाव टाकला जातो. त्यांना सोशिल मीडिया वरून ट्रॉल केले जाते, त्यांच्या बदनामीसाठी सोशल मीडिया आर्मी सज्ज असते. अनेक दशकांपासून पत्रकारितेत असलेले पुण्य प्रसून वाजपेयी , रवीश कुमार, अभिसर शर्मा हि अशीच काही टेलिव्हिजण मीडियातली नावे . हि सर्वच मंडळी काँग्रेस शासनाच्या काळातही सरकारवर टीका करायची त्यांना कठीण प्रश्न विचारायची तेव्हा ते सन्माननीय पत्रकार होते परतू हीच गोष्ट विद्यमान सरकारच्या काळात ते करू लागले तेव्हा त्यांना देशद्रोही म्हणून प्रसारित करण्यात आले. त्यांच्या कार्यक्रमात भा.जा.प च्या प्रवक्त्यांनी जाणे बंद केले. त्यांना काँग्रेस चे चमचे म्हणूंन हिणविण्यात आले. एवढंच पुरेस नव्हते म्हणून कि काय NDTV  च्या प्रसरणावर विद्यमान सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने राष्टीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत एका दिवसाची बंदी लावून पुन्हा काही काळ आणीबाणीची आठवण करून दिली. आणि काही दिवसनपूर्वीच पुण्य प्रसून जोशी याना ABP न्युज चॅनेल मधून बाहेर पडण्यासाठी दबाव आणला गेला या साऱ्या घटना लोकशाहीचा डंका वाजविणाऱ्या शासनाने हुकूमशाही पद्धतीने आमलात आणल्या.
   आम्हाला पूरक असेलेली मते असणारे सर्वच देशप्रेमी आणि थोडा वेगळा विचार मांडणारे , प्रश्न विचारणारे सगळेच देशद्रोही हे कुठेले मापदंड सरकार लावू पाहत आहे कुणास ठाऊक. याच महिन्यात माननीय पंतप्रधान मोदीजींनी मन कि बात या कार्यक्रमचा ५० व्या भागातून जनतेशी संवाद साधला. खरेतर असा संवाद साधण्याची कला आणि रेडिओचा एवढा प्रभावी वापर कुठल्याच भारतिय नेत्याने  केलेला नाही. परंतु याला सवांद म्हणावे का कारण हे उद्बोधन एकतर्फी असते. मन कि बात या कार्यक्रमातून , गणतंत्र दिवस आणि स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून ,अनेक सभा संमेलनातून माननीय पंतप्रधानांनी जनतेशी यापूर्वी कुणीही साधला नसेल एव्हढा सवांद साधला आहे. परंतु या चार वर्षात त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही आणि ज्या काही दोनचार मुलाखती न्युज चॅनेल्स ला दिल्या त्या कुणाला दिल्या आणी त्यातील प्रश्न कुतूहल असेलल्या वाचकांना youtube वर सहज बघायला मिळतील.
    सरकारच्या निती योग्य आहेत कि अयोग्य , कारभार पारदर्शक कि अपारदर्शक , कार्यकाळ समाधानकारक कि असमाधानकारक हा माझा लेखनाचा विषय नाही, तेव्हढा माझा अभ्यास नाही आणि काही मत असलीच तर ती माझी वैयक्तिक  मते आहेत. परंतु ती मते मी आणि माझ्यासारखे सामान्य माणसे ज्या माध्यमातून बनवितात त्या माध्यमांची गळचेपी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला कदापि मान्य होणार नाही. हीच घुसमट या लेखामागची प्रेरणा आहे.
    बऱ्याच वाचकांना असा प्रश्न पडला असेल कि तुम्ही या सरकारलाच का दोष देता. मागील ६० वर्षात काँग्रेस ने जे केले त्या बद्दल तुम्ही का नाही बोलत . तर त्या सर्व मित्रांना मी सांगू इच्छितो कि समजा तुम्ही शान हा चित्रपट पाहत आहात. हा चित्रपट चालू असताना  चित्रपटाचा नायक अमिताभ बच्चन अचानक शानच्या  फ्रेम मधून बाहेर पडून शोलेच्या फ्रेममध्ये शिरून गब्बरसिंगला हाणत नाही. चित्रपट जर शान असेल तर गोष्ट हि शान मधल्या शाकालचीच व्हायला हवी शोले मधल्या गब्बरची नाही म्हणून सध्या देशातील विद्यमान सरकारलाच प्रश्न विचारले जातील . तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांवर किंवा केलेल्या टीकेवर तुम्ही काँग्रेस च्या काळात कुठे होतात हा प्रश्न उत्तर होऊ शकत नाही. काँग्रेस शासनाच्या काळातही दबावतंत्राचा वापर होतहोताच परंतु माध्यमांच्या मुस्कटदाबीचा जो प्रकार विद्यमान सरकार चालवते आहे त्यातून पुढे इतर पक्षही धडा घेणार नाहीत हे कशावरून.
    बट्राड रसेल यांचं एक अप्रतिम वाक्य आहे . ते म्हणतात In democracy the fools have right to vote & in dictatorship the fools have right to rule. आपल्या सुदैवाने आपल्या पूर्वजांनी पहिल्या प्रकारची शासनव्यवस्था स्वीकारली आहे. ज्यात कुणी मुर्ख असो कि हुशार प्रत्येकाचा मतदानाचा अधिकार आहे आणि राज्यकर्त्यांना प्रश्न विचारून आपले मत बनविण्याचा अधिकार आहे . परंतु  कुणी  जर तुमच्या प्रश्न विचारण्याच्या अधिकारावरच गंडांतर आणत असेल तर ...
  मुझे मालूम नहि के हिंदू खतरेमे है , या मुसलमान खतरे मे है   
  अगर सवाल पुच्छना मना है तो जरूर इन्सान खतरे मै है  

Saturday 17 November 2018

नलीच्या निमित्ताने


"कवळ्या नजरेची कवळी कळी पोर
कवळ्या  डोळ्यातील कवळी भिरभिर
कवळ्या पिरतीच्या कवळ्या खाणाखुणा
कवळ्या हातावर कवळा कात चुना "

    कवी इंद्रजीत भालेराव यांच्या या ओळी, लेखक मिलिंद बोकील यांची शाळा हि कादंबरी किंवा श्रीकांत देशमुख लिखित नली हे नाटक या सर्वात मला एक सामान धागा जाणवतो. स्वातंत्र्यानंतर  खेडेगावातील घरातून शिक्षण घेणारी हि पहिली पिढी  आणि त्या पिढीच्या बालपणातील तसेच बालमानांतील खोलवर कप्यात दडून बसलेल्या, वेणीफणी घालणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकणाऱ्या त्यांच्यासोबतच्या अल्लड पोरी .या मनात दडून बसलेल्या पोरिनीच या पिढीतील काही तरुणांना लिहीत केलं बोलत केलं. ज्यातून मातीतून आलेल्या या माणसांनी मातीतल्या कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्यात आणि तुम्हा अम्हासारख्याना त्या प्रचंड भावल्यात कारण आपण कुठेतरी आपलीच गोष्ट ऐकत असल्याची अनुभूती या साहित्याने आपल्याला दिली. कांहीस असाच भारून टाकणारा अनुभव काल जळगावच्या परिवर्तन या संस्थेंच्या नली या नाटकातून मिळाला तो काहीअंशी तुमच्याशी वाटून घ्यावा  म्हणून हा लेखनप्रपंच.
      नली हे एकलनाट्य श्रीकांत देशमुख यांच्या कथेवर आधारलेले आहे. मागील अनेक वर्षांपासून जळगाव शहरात परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून  सांस्कृतिक परिवर्तनाचा रथ हाकणारे जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांची हि संकल्पना. यांचं सांस्कृतिक परिवर्तनाचे आणि त्यातून होणाऱ्या मंथनाचे थोडेफार तुषार खान्देशातील इतर शहरावर उडताहेत त्याचाच परिपाक म्हणजे धुळे शहरात काल झालेला नली या नाटकाचा प्रयोग. या नाटकाचे दिग्दर्शन योगेश पाटील या नव्या दमाच्या तरुणाने केलेले आहे. मुळातूनच खेड्यतून आलेला हा तरुण या नाटकाच्या माध्यमातून जे इरसाल ग्रामीण रंग या नाटकात भरतो ते वाखाणण्या जोगे आहे. एकलनाट्या हा एकपात्री प्रयोगच असतो यात आपल्या अभिनयातून सर्वच पात्र उभी करण्याची क्षमता आणि प्रतिभा अभिनेत्यात असायला हवी. विविध भूमिकांचं नेमकं अवलोकन, त्यांच्या देहबोलीचा अभ्यास, ग्रामीण त्यातही तावडी आणि अहिराणी या भाषांवरची पकड  आणि क्षणात बदलणारी व्यक्तिरेखा या साऱ्या गोष्टी आपल्या अभिनयातून जिवंत करणारा अभिनेता म्हणजे  हर्षल पाटील. या तरुण अभिनेत्याचा रंगमंचावरचा सहज वावर आणि आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे. हे कुठेले नाटक नसून  गावात कुठेतरी मारुतीच्या देवळावर, शाळेत, विहिरीच्या वाटेवर रोज घडणारे संवाद आहेत असाच भास होत राहतो. आपल्या विलक्षण बोलक्या डोळ्यांनी हर्षल या दहा ते बारा व्यक्तिरेखा लीलया साकारतो. कधी मनमुराद हसवतो तर कधी टचकन डोळ्यात पाणी आणायला भाग पाडतो. हर्षल चा हा अभिनय सहज आहे त्यात कुठलाही अविर्भाव नाही ज्यातून आपण नाटकाच्या अजून जवळ जाऊन पोहचतो.
   आपल्यासोबत शाळेत शिकत असलेल्या पोरींचे नेमके काय झाले असेल हा प्रश्न फेसबुक आणि व्हाट्सअँप सारखा सोशल मीडिया नसताना शिकून तरुण झालेल्या संपूर्ण पिढीला सतावत आला आहे .त्यातल्या त्यात मोठ्यघरातल्या किंवा लग्न करून मोठया घरी गेलेल्या काही मुली सुखवस्तू झाल्या असतीलही परंतु शेतात राबणाऱ्या , दिवसभर गुरांमागे फिरणाऱ्या , विहिरीवरून पाणी आणणाऱ्या आणि मधेच शिक्षण सुटलेल्या पोरींची सगळी पिढी काळाच्या  कप्यात कुठे गडप झाली आणि आज देखील होते आहे हा अस्वस्थ करणारा प्रश्न काही केल्या पाठ सोडत नाही.   एकार्थाने त्यांचं असे नाहीसे होणे हे दुःखद असेल हि परंतु जेव्हा नली हि नाटकातल्या बाळूला आयुष्याच्या प्रेत्येक टप्यावर भेटत राहते तेव्हा शाळेनंतरचे तिचे भेटणेही कुठे आनंददायी  असते. शेवटी मातीतल्या या मुलींचे  माती  होऊन जाणे हि घटना कुठे सुखावणारी आहे. आज शेतकऱ्यांच्या मुली शेतकरी नवरा नको म्हणतात कारण त्यांना शहरात जाण्याची आणि सुखात राहण्याची इच्छा असेलही पण त्या पेक्षाही त्यांना नको असत ते असं झुरत झुरत मातील मिसळून जाणं.
   नाटक या कलाप्रकाराचे वगेळेपण म्हणजे हि एक जिवंत कला आहे. नाटकाचा अनुभव हा नाट्यगृहातूनच मिळू शकतो. कितीही ताकदीच्या अभिनेत्यांचा कितीही चांगला अभिनय पडद्यावर दिसत असला तरी प्रत्यक्ष रसिकांच्या समोर उभं राहून नाटक सादर करण्याची सर त्याला येणार नाही आणि बहुतेक म्हणूनच नसरुद्दीन शाह सारख्या अनेक  सिनेमातल्या नवलजेलेल्या अभिनेत्यांना  नाटक करण्याचा मोह अजून हि सुटत नाही. नाटकासारख्या अलौकिक कलेला हल्ली चांगले दिवस नाहीत. या क्षेत्रातील कलावंतांना स्वतःच्या मेहेनतीने नाटक उभं करावं लागत आणि नंतर काही ठिकाणी ते बघण्यासाठी प्रेक्षक हि शोधावे लागतात. या सर्वामागे आमच्यासाखे उदासीन रसिक जबादार आहेत कि फक्त हसवणूक आणि त्यातून प्रेक्षकांची फसवणूक करणारी नाटके आणि नाट्यसंथा जबाबदार आहेत हे न उलगडणारे कोडे आहे. परंतु यामुळे आजच्या पिढीचे सांस्कृतिक , बौद्धिक कुपोषण होत आहे हे मात्र नक्की. परिवर्तन सारखी संस्था हि कोंडी फोडू पाहत आहे आणि नली सारखा प्रयॊग हि त्यांनी मारलेली  मुसंडी आहे हे माहे प्रामाणिक मत आहे.
   हे नाटक ज्या जेष्ठ रंगकर्मी यादव खैरनार याच्या स्मृतिमोह्त्सवाच्या निमित्तानं अनुभवयाला मिळाले त्या यादव दादांचे,सौ रंजना खैरनार ताईचे , खैरनार परिवाराचे,  तसेच अखिल भारतीय नाट्य परिषद धुळे , मानवता बहुउद्देशीय विकास संस्था धुळे, लोकमंगल कलाविष्कार संस्था , मॅड स्टुडिओ ,महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या ,आर्थिक पाठबळ पुरविणाऱ्या सर्व नाट्यसवेकांचे आणि धुळ्यात खासकरून  नाटक रुजविण्यासाठी जीवापाड प्रयत्न करणाऱ्या संदीप पाचंगे , मुकेश काळे या नाट्यवेड्याचे धुळेकर  रसिकांच्या वतीने मनापासून आभार आणि धन्यवाद .
                                        विनय पाटील, धुळे 

Sunday 15 April 2018

कविता बिवीता.. असिफा

मला माफ करा परंतु क्रुपया कुणी
त्या आठ वर्षे वयाच्या मुलीचा उल्लेख करूच नका...

क्रुपया कुणी ही आपला डि पी काळा ठेऊ नका किंवा त्या रेपच्या घटनेची पोस्ट पूढे पाठवू नका

काय आहे आपण अस करुन आपला सात्विक संताप व्यक्त करतात हे खरय परंतु तुमच अस करण्याने मला सारखी सारखी ती चिमुरडी आठवत रहाते

माझा पिछाच सोडत नाहीये ती चालतांना, वाचतांना, बोलतांना, विचार करतांना ...

तीच्या डोळ्यात सारखी मला माझीच मुलगी, बहीण, आई दिसत असते जी विचारत असते मला मानवी संभ्यता या शब्दाचा अर्थ

आणि जातीचा, धर्माचा, राष्टाचा अभिमान बाळगनारा मी तिला प्रचंड आपराधी पणाच्या भावनेने सांगतो


आज मला खरोखरच लाज वाटते आहे माझ्या माणूस असण्याची...

Friday 30 March 2018

महायुद्धांच्या चित्रकृती भाग २: खिरस्तोफर नोलन आणि डंकर्क...

       इंग्रजि साहित्यात पदवी घेत असलेला एक ब्रिटिश विद्यार्थी १९९२ सालच्या सुट्यांमध्ये आपली मैत्रीण इम्मा थॉमस  आणि आणखी एका मित्रांसोबत इंग्लंडहुन फ्रान्सला  बोटेने निघाला होता. बोटेच्या डेकवरून जसे  त्यांना शहर दिसू लागले तसे त्याची मैत्रीण आनंदाने ओरडली 'डंकर्क'. कुठल्याही मराठी माणसाला रायगड असे म्हटल्यावर जे काही होते तसेच काहीतरी नातं ब्रिटिशांचे  डंकर्क या ठिकाणाशी आहे. मुळात फ्रान्सच्या किनाऱ्यावरील हे एक शहर ब्रिटिशांची अस्मिता, पराक्रम आणि लढाऊवृत्ती यांचे कारण कसे ठरू शकते याची पाळेमुळे दुसऱ्या महायुद्धात आहेत.अस्मिता,राष्टप्रेम आणि गौरवशाली इतिहास या साऱ्यांच्या व्यतिरिक्त त्या  तरुणाच्या मनात त्या क्षणी अजून काहीतरी आले. कल्पकता ,प्रयोगशीलता आणि महत्वाकांक्षा यांचा मिलाफ असलेला तो तरुण येणार्र्या शतकातला एक  महत्वाचा चित्रपट दिग्दर्शक होता.ज्याला फ्रान्सच्या किनाऱ्यावरील '
डंकर्क' हे शहर बघून त्या दिवशी  एका चित्रपटाची कल्पना सुचली होती. २०१८ सालच्या ९० व्या ऑस्कर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या यादीत स्थान मिळवणारा तो चित्रपट म्हेणजे डंकर्क आणि त्या बोटेवरचा तो प्रतिभावान तरुण म्हणजे जागतिक सिनेमात प्रयोगशीलतेसाठी ओळखला जाणार दिग्दर्शक 'खिरस्तोफर नोलन'.
        हॉलिवूडच्या सिनेमात रस असणाऱ्यांना ख्रिस्तोफर नोलन हे नाव तसे नवे नाही. मोमेंटो ( ज्यावर अमीर खानचा गजनी बेताल होता) द प्रेस्टिज, इनसेप्शन, द डार्क नाईट, इंटरस्टेलर असे अनेक कल्पकता ,प्रयोगशीलता आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीतले  मैलाचे दगड ठरलेल्या चित्रपटांचा तो कर्ता आहे.  त्याची ओळख सांगण्यासाठी एवढे पुरेसे आहे. नोलनच्या चित्रपटांची संपूर्ण जगात अतिशय आतुरतेने वाट पहिली जाते फक्त सिनेरसिकच नव्हे  तर अनेक समीक्षक देखील त्याच्या चित्रपटाचे चाहते आहेत परंतु ऐतिहासिक घटनेवर चित्रपट बनविण्याचा हा त्याचा पहिलाच प्रयत्न होता.
         १९३९ ते १९४५ दरम्यान लढल्या गेलेल्या दुसऱ्या महायुद्धातल्या २६ जुन ते ४ मे १९४० दरम्यान घडलेल्या एका प्रसंगावर हा सिनेमा बेतलेला आहे. नाझी सैन्याच्या जोरदार मुसंडी पुढे टिकू न शकलेल्या दोस्त राष्ट्राच्या फौजा डंकर्क या फ्रान्सच्या पश्चिम किनाऱ्यावरील एका शहरात एकवटलेल्या आहेत. दोस्त राष्ट्रांच्या सुमारे चार लाख सैनिकांना नाझी फौजेने जमिनीच्या बाजूने घेरलेले आहे .नाझी सैन्याच्या हाती लागण्यापूर्वी समुद्रमार्गे या सैन्याला नागरी बोटांमधून इंग्लंडमध्ये नेण्याचा प्रसंगाला इतिहासात डंकर्कची यशस्वी माघार म्हणून संबोधले जाते. महायुद्धाच्या सुरवातीसच जर एवढे मोठे सैन्य हिटलरच्या हाती लागले असते तर कदाचित दुसऱ्यामहायुद्धाचा आणि जगाचा इतिहास हा वेगळा असता.म्हणूनच डंकर्कची यशस्वी माघार हि जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी मह्तवपूर्ण घटना म्हणून ओळखली जाते.   
       ख्रिस्तोफर  नोलेनचे चित्रपट हे एकाच प्रयत्नात काळतील असे मुळीच नसतात. त्याच्या चित्रपटाची कथा कधीही एका सरळ रेषेत प्रवास करीत नाही तर आढेवेढे घेत जाते आणि अधिक गुंतागुंतीची असते .शिवाय Timespace म्हेणजेच काळ आणि वेळ हि देखील त्याचा चित्रपटात एकाचवेगाने प्रवास करताना आढळून येत नाही. खासकरून वेळ ह्या चौथ्या मितीचा त्याचा चित्रपटातला वापर हि गोष्ट प्रेक्षकांना चक्रावून सोडते.खासकरून इनसेप्शन, इंटरस्टेलर आणि डंकर्क या चित्रपटातला त्याने वेळेचा केलेले वापर त्याचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे. नोलन प्रेक्षकांना कधीच गृहीत धरत नाही आणि प्रेक्षकांना काहीही रेडिमेड देणे देखील टाळतो.डंकर्क हे त्याचे ताजे उदाहरण म्हणता येईल.
        हा चित्रपट एकाच वेळी  हेवेत ,पाण्यात आणि जमिनीवरील  तीन वेवेगळ्या घटनांना सोबत घेऊन चालतो .या तीनही घटनांचा एकदुसरीशी संबंध आहे परंतु त्या घटनांतील वेवेगळ्या वेळांमध्ये घडणारे प्रसंग नोलन प्रेक्षकांसमोर मांडतो आणि त्या सर्व प्रसंगांचा संबंध जोडून त्यांचा अर्थे समजावून घेण्याची जबाबदारी पुर्नपणे प्रेक्षकांची असते. प्रेक्षकांना बौद्धिक कसरत करायला लावणे हि नोलनच्या दिग्दर्शनाची खासियत आहे.याच कारणामुळे त्याचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिल्यास वेगवेगळे संदर्भ स्पष्ट होत जातात.
          नोलनचा आणखी एक महत्वाचा दिगदर्शकीय पैलू म्हणजे त्याचा चित्रपटातील पात्रांना तो नेहमी काहीं कठीण पर्याय देऊन त्यातून एकाची निवड करण्यास भाग पाडीत असतो. त्याच्या बहुतेक चित्रपटाचा तोच लेखक किंवा सहलेखक असल्यामुळे चित्रपटात असे निर्णयाचे प्रसंग उभे करण हे त्याला आवडते हे स्पष्ट होत. डंकर्क या चित्रपटात रॉयल नेव्हीच्या  स्पिटफायटर विमानात फक्त एक तास पुरेल एवढंच इंधन शिल्लक असताना दोस्त राष्ट्रांच्या फौजांना जर्मन बॉम्बर्स विमानांकडून   चिरडले जाऊ द्यायचे कि परतीचे सर्व मार्ग बंद करून लढत राहायचे याचा निर्णय वैमानिक असलेल्या टॉम हार्डी याला घ्यायचा असतो तर आपल्या बोटीत मरणाच्या तोडांत असलेल्या मदतनीस म्हणून आलेल्या मुलाला वाचवण्यासाठी परत फिरावे कि पाण्यात बुडून मारणाऱ्या सैनिकांना वाचवण्यासाठी पुढे जावे याचा निर्णय नागरी बोटीचा मालक असेलेल्या मार्क राईलान्स याला घ्यायचा असतो. असेच प्रसंग त्याचा इतर चित्रपटातही दिसतात .अशा प्रसंगातून श्रेयस आणि प्रेयसाच्या निवडीतला संघर्ष उभा करण हे नोलनला आवडते.
              आपला चित्रपट वास्तवाच्या अधीक जवळ घेऊन जाण्यासाठी जागतिक सिनेमातील काही दिगदर्शक कमालीचे बांधील असतात .नोलन हा त्यातलाच एक आहे,म्हणून डंकर्क मध्ये कधी विमानांमधील युद्ध दाखविताना तो खर्या फायटर विमानात अभिनेत्याला बसवून आणि फ्रंट तसेच रेअर कॅमेरा लावून टनेल इफेक्ट मिळवतो तर कधी डंकर्कच्या मोहिमेत खरोखर सहभागी झालेल्या नागरी बोटींना मिळवून पुन्हा चित्रीकरणासाठी वापरतो .चित्रपटाच्या बारकाव्यातून आणि सूचक प्रतिमेतून परिणाम साध्य करण्याची विलक्षण हातोटी असेलेले असे काही दिगदशक आज आपल्याला जागतिक सिनेमात पाहायला मिळतात.
    या चित्रपटातले सवांद अतिशय नेमके आहेत आणि संवादाहूनही त्यात येणारे पॉज हे अधिक काही सांगत असतात. उदाहरण म्हणजे जेव्हा ब्रिटिश नागरी नौका डंकर्कच्या किनाऱ्यावर सैनिकांना घेण्यासाठी येताना नेव्ही कमांडर बाल्टन याला दुर्बिणीतून दिसतात तेव्हा तो आपल्या सहकारी फ्रेंच अधिकाऱ्याला म्हणतो " You can particularly see it from here   ....home "  . दुसऱ्या एका प्रसंगात इंग्लंडच्या किनाऱ्यावर सुखरूप परतलेल्या सैनिकांना एक अन्धवृद्ध व्यक्ती ब्लॅंकेट वाटत  वेल डन म्हणत असते. तेव्हा अॅलेक्स नावाचा सैनिक त्याला म्हणतो "  All we did is survive  "  हे ऐकून तो वृद्ध उद्गारतो " That's enough " . मुळात युद्धेशास्राच्या नियमाप्रमाणे डंकर्कची माघार हा ब्रिटिशांचा मोठा पराभव होता आणि १९४२ सालच्या सिंगापूरचा पडावापर्यंत तो खोरोखऱ पराभव समजला जात होता परंतु सर्वसामान्यांसाठी  एवढ्या सैनिकांचे वाचलेले प्राण हि घटना नैतिक विजयाची होती आणि याच नैतिक विजयाचा डंका वाजवून ब्रिटीश पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी सैन्याचं आणि नागरिकांचे मनोधिर्य कमालीचे उंचावले होते.जे दुसऱ्या महायुद्धातील दोस्त राष्ट्रांच्या विजयमागचे एक महत्वाचे करण होते.
            या संपूर्ण चित्रपटात कुठेही, जर्मन रणगाडे,नाझी सैनिक त्यांचा हिंसाचार इत्यादी दिसत नाही .शत्रूची अचानक येणारी बॉम्बर विमाने ती देखील लॉन्ग शार्टमध्ये आणि त्यांचं आवाज तसेच चित्रपटाला हॅन्स झिम्मर याचे पार्शवसंगीत आणि परतीच्या वाटेकडे अगतिकपणे पाहनारे सैनिक यांच्याच वापराने अपेक्षित परिणाम साधला जातो. सोबतीला असते ती अचंबित करणारी सिनेमॅटोग्राफी, जी  नोलानच्या चित्रपटांचा आत्मा असते. सिनेमॅटोग्राफी आणि प्रतिमांचा प्रभावी वापर करून नोलन आपल्याला थेट युद्धभूमीतच नेवून सोडतो, म्हणून शक्य असल्यास त्याचे चित्रपट हे सिनेमागृहातच पाहावेत.     
       काही जाणकारांच्या मते डंकर्क हा ख्रिस्तोफर नोलनचा आतापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे .स्वतः नोलन म्हणतो कि या चित्रपटात मी खूप जास्त प्रोयोग केले आहेत. बहुतेक यामुळेच ९० व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये डंकर्कला सर्वोत्तम दिग्दर्शकासह  तब्ब्ल ८ नामांकने मिळाली होती ज्यात बेस्ट साऊंड एडिटिंग, बेस्ट फिल्म एडिटिंग आणि बेस्ट साऊंड मिक्सिग या  विभागात हा चित्रपट पुरस्कार पटकाविण्यात यशस्वी ठरला. २०१८ सालच्या ९० व्या ऑस्कर पुरस्कारांची विशेष बाब म्हणजे डंकर्कच्या घटनेचे सूत्रधार तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विस्टन चर्चिल यांच्या जीवनातील दुसऱ्या महायुद्धवर आधारित The darkest hour या चित्रपटातील अभिनयासाठी गॅरी ओल्डमॅन या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हि घटना आज ७३ वर्षांनंतरही जागतिक सिनेमावर असेलेला दुसऱ्या  महायुद्धाचा प्रभाव विशद करते.   
    चार्ल्स रॉबर्ट डार्विन या महान जीवशास्र्ज्ञाने सांगितले आहे कि काहीही करून आपले अस्तित्व टिकऊन ठेवणे आणि ते टिकविण्यासाठी उत्क्रांत होणे हि सजीवांच्या जगण्याची दोन महत्वाची प्रयोजने आहेत. म्हणूनच निसर्ग नियमाप्रमाणे प्राणी आणि मनुष्य जिवंत राहण्यासाठी शक्य ते सर्व करतात .फरक एवढाच असतो कि प्राण्यान्माधले हे survival शक्तीने किंवा युक्तीने होत असते तर माणसांमध्ये शक्ती ,युक्ती, राजकारण ,अर्थकारण, समाजकारण, आणि प्रसंगी स्वतःचे प्राण धोक्यात घालून इतरांना वाचवण्याइतपत टोकाची मानवी संवेदना या साऱ्यावर अवलंबून असते.जी प्रेक्षकांना या चित्रपटात रॉयल एअर फोर्स च्या वैमानिकात,अखेरच्या फ्रेंच सैनिकांसाठी डंकर्कवर थांबलेल्या नेव्हल  कमांडरमध्ये आणि आपल्या नागरी बोटी घेऊन युद्धात अडकलेल्या सैनिकांना न्यायला आलेल्या ब्रिटिश नागरिकांमध्ये पाहायला मिळते.
          एका प्रचंड मोठ्या मानवी समूहांची जिवंत राहण्यसाठीच्या संघर्षची गोष्ट सांगणारा आणि सोबतच युद्धाचे भयाण वास्तव मांडणारा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा  आवर्जून पाहावा असा चित्रपट  "डंकर्क..."   

विनय पाटिल... दिनांक 30 मार्च 2018

Thursday 15 March 2018

सिनेमा बिनेमा ...Me Before You...जगन सुंदर आहे ,जगण्यातील वास्तवासकट...


हॉलिवूडच्या गाजलेल्या 'स्पार्टा' हा सिनेमा संपण्यापूर्वी अखेरच्या दृश्यात अजिंक्य अशा स्पार्टन साम्राज्यावर विजय मिळवलेला अखिलीस हा महान योद्धा अपोलो या स्पार्टन साम्राज्याच्या  अजेयतेची निशाणी असलेल्या ग्रीक देवतेच्या पुतळ्याचं मस्तक तलवारीने धडावेगळे करताना म्हणतो "देवतानाही मनुष्याचा हेवा वाटतो कारण मनुष्याला मरणाचं वरदान आहे ",
    अतिशय रोमहर्षक वाटणार हे वाक्य परंतु वास्तवात तेव्हडे खरे आहे काय .मरणाचं वरदान असेलेली हीच मानस जेव्हा त्यांच मरण समोर स्पष्ट दिसत असत तेव्हा मात्र सैरभैर होतात. आपला मृत्य अटळ आहे आपण सारेच जाणतो परंतु तो नक्की  केव्हा आणि कसा येणार हे  नजानेच आपले जगणे सुसहाय बनवत असत . मात्र काही व्यक्तींना आपला मृत्यू केव्हा आणि कसा यावा हे निवडण्याचं वरदान किंवा अभिशाप लाभतो ते ईच्छामरणाने .
     'मी बिफोर यु' हा २०१६ साली प्रदर्शित झालेला सिनेमा अपघातात कायमच आणि वेदनादायक अपंगत्व आलेल्या 'सॅम फ्रँकलिन' या देखण्या ,श्रीमंत,साहसी,परंतु अपंगत्वामुळे जगण्याला कंटाळलेल्या नायकाची इच्छामरण स्वीकारण्याची कथा आहे. सॅम आपल्या मातापित्यांचा कारणाने आपले मरन काही दिवस लांबणीवर टाकतो . यादरम्यान सॅमची देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त झालेली 'एमिला क्लार्क'( जिला आपण गेम ऑफ थ्रॉन या गाजलेल्या सिरीज मध्ये पाहत आहात) या सुंदर ,चुणचुणीत,थोडीशी बावळट परंतु जगण्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या तरुणीची नियुक्ती होते. सॅम हा आपल्या पूर्वीच्या आयुष्यात साहसी गोष्टी करणारा,भरपूर पर्यटन करणारा ,यारोका यार असणारा तरुण अपघातातून आलेल्या अपंगत्वाने ,वेदेनने आणि असाह्यतेने सतत वैतागलेला  असतो .तर इमीला हि हसतमुख ,अव्यहारीक ,आणि पैशाच्या निकडीमुळे पडेल ते काम करणारी मुलगी त्याला काहीही करून आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात असते .पुर्नपणे भिन्न पाश्र्वभूमी  असलेल्या या दोघांचे जाण्यासंबंधीचे आणि जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन एकदुसऱ्याच्या सानिध्यात अधिक व्यापक होत जातात.या सर्वात एमिला समोर सर्वात मोठे आव्हान असते ते सॅमचा इच्छामरणासंबंधीचा विचार बदलणे परंतु इमीला काही केल्या तो विचार बदलू शकत नाही .याउलट तिलाच केवळ जगणेच नव्हे तर मृत्यू देखील परिपूर्ण आणि आनंददायक असू शकतो हा नवीन विचार लाभतो.
      सगळ्याच इच्छा त्यागल्यात कि मनुष्याला पूर्णत्व येऊ शकते हा अध्यत्मातला एक मान्यताप्राप्त विचार आहे परंतु तो जगण्यातल्या वास्तवाशी फारकत घेतल्यासारखा वाटतो .साऱ्याच इच्छा त्यागल्यात कि मग महत्वाकांक्षी  व्हावे ते कसे आणि उन्नत व्हावे ते कसे जे निसर्ग नियमाप्रमाणे सजिवांच्या अस्तित्वाचे प्रयोजन आहे .असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात परंतु हा चित्रपट असा फारसा खोलातला विचार माडांन्या ऐवजी मृत्यू जर अटळ आहे तर आनंदाने  त्याचा स्वीकार करावा हेच तत्वज्ञान मांडताना दिसतो.
      या चित्रपटात इंग्लंड मधील शहर ,वास्तू,आणि निसर्ग या साऱ्याच सुंदर चित्रीकरण दिसत.चित्रपटाच्या प्रेत्येक फ्रेम मध्ये सौंदर्य भरून राहत आणि या सोबत साथ असते ती मधुर पार्श्व् संगीताची परंतु चित्रपटाची सर्वात महत्वाची जमेची बाजू म्हणजे इमीला क्लार्क या नितांत सुंदर हास्य असेलेल्या अभिनेत्रीचा सहज, सुंदर अभिनय . इमीलाच्या प्रत्येक कृतीतून,हास्यातुन,बोलण्यातून चैतन्य सळसळत असत . आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर या गुणे अभिनेत्रीने हा चित्रपट तोलून धरला आहे.
     आपल्या साऱ्यांच्याच आयुष्यात असे प्रसंग किंवा मानस येतात ज्यांच्या येण्याने आपल जगन आमूलाग्र बदलून जात.आयुष्यातल्या अशाच व्यक्तीला किंवा प्रसंगाला डोळ्यासमोर ठेवून पाहावा असा सिनेमा 

....Me Before You....

Sunday 11 March 2018

कविता बिविता ....स्वर्ग




ह .भ. प कुणी मला म्हणाले कशास आपण जन्मा आले
दानधर्म ना पुण्य कर्म ना , असेच किती जन्म जाहले
जगता आपण ऐसे जैसे स्वर्ग आपल्या खिशात आहे
किंवा मजला सांगुनी टाका स्वर्ग आपला कशात आहे.

ऐकून त्यांची कुत्सित वाणी मीही झालो पाणी पाणी
विवेक सारा बाजूस ठेवून उत्कटतेने म्हणालो आणि ...

स्वर्ग उमदं राहण्यात आहे
स्वर्ग विसरून जाण्यात आहे
नजरानजर होताच कुठे
स्वर्ग लाजून पाहण्यात आहे

स्वर्ग कवीच्या ओठात आहे
स्वरगंगेच्या काठात आहे
गुलाब ,जाई फुलविणाऱ्या
माळावरल्या पाटात आहे

स्वर्ग नाकाच्या नथीत आहे
स्वर्ग समईच्या वातीत  आहे
कन घेऊन कणीस देत्या
स्वर्ग काळ्या मातीत आहे

स्वर्ग दोन देण्यात आहे
स्वर्ग दोन खाण्यात आहे
निर्ढावलेल्या मुजोरांना
छातीवरती घेण्यात आहे

स्वर्ग वरातीत नाचण्यात आहे
स्वर्ग मनमुराद हसण्यात आहे
तळीरामांच्या गप्पा ऐकत
चकणा खात बसण्यात आहे

स्वर्ग आमटीच्या झुरक्यात आहे
स्वर्ग भाकरी आणि झुणक्यात आहे
दोन खापात कांदा फोडणाऱ्या
तळहाताच्या दणक्यात आहे


स्वर्ग शनिवार वाड्यात आहे
शिवरायांच्या पोवाड्यात आहे
कुस्ती आणि लावणी वरच्या
महाराष्ट्राच्या वेडात आहे


स्वर्ग अप्सरा आलीत आहे
ओठावरल्या लालीत आहे
काळजाच्या ठाव घेत्या
मादक मोहक चालित आहे

स्वर्ग कधी प्रारब्धात आहे
गतकाळाच्या गद्यात आहे
जगण्यावरती प्रेम करत्या
पाडगावकरांच्या शब्दात आहे


स्वर्ग पुस्तकाच्या  गंधात आहे
वाचनाच्या बंधात आहे
वाचता वाचता लिहीत करंत्या
कवितेच्या छंदात आहे

स्वर्ग देत राहण्यात आहे
हृदयगीत गाण्यात आहे
मिळुनी साऱ्या रंगामध्ये
पाण्यासारखे वाहण्यात आहे

तुटण्यापूर्वी तगण्यात आहे
विझण्यापूर्वी धगन्यात आहे
स्वर्गाच्या इच्छेत मरण्याआधी
स्वर्ग बेधुंद जगण्यात आहे
 
   
       विनय पाटील
      १७/०१/२०१६

माझे ट्रेकानूभव...संदकफू डायरी...भाग सहा

पाचवा दिवस :
"उगवतिचे ऊन आता मावळतिला पोहचले आहे
मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचले आहे,
तक्रार नाही खंत नाही संपण्यासाठीच प्रवास असतो
एक दिवस मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो... "
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या ओळींना स्मरुण मी ट्रेकच्या आजच्या अखेरच्या दिवसाची सुरुवात केली. पाच दिवसांपुर्वी सुरू झालेला आमच्या ट्रेकचा उगवतीचा प्रवास आज मावळतिला झुकला होता. गुरदुंग या स्वर्गीय सैदर्याने नटलेल्या ठिकाणाहून पाय निघत नव्हता परंतु हाती कितिही सुंदर आणि सुखद गोष्टी असल्यात तरी त्या सोडून देण्याशिवाय कधि कधि माणसांना पर्याय नसतो.
दिनांक 20 मे 2017 या दिवशी सकाळी 8.00 वाजेच्या सुमारास आम्ही गुरदुंग या ठिकाणाहून चालायला सुरुवात केली. आजची वाट देखिल काल प्रमाणेच दाट आरण्यांतून जाणारी फुलांनी बहरलेली पायवाट होती. वाटेत उगवलेली करवंदाच्या आकाराच्या आंबटगोड स्ट्रॉबेरीजचा आनंद घेत आम्ही उतरत होतो. काही अंतरावरच कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज आमच्या काणावर येऊ लागला. उत्सुकता वाढली तसे आम्ही भराभर उतरु लागलो आणि एका वळणावर पहातो तर काय शुभ्र दुधासारखा फेसाळलेला धबधबा. आम्ही आता एका दरीतून जात होतो आणि त्याच दरीतून वाहणार्‍या लहानशा नदीवर पाई चालणाऱ्यांसाठी एक पुल उभारण्यात आला होता हव तर दुधसागरची लहान प्रतीक्रूती म्हणा. त्या पुलावरून आम्ही भरपूर फोटो घेतलेत. खरतर पाणी पाहील की पोहता येणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडाला पाणीच सुटत. धबधबा पाहूनतर पाण्यात उतरण्याची फारच इच्छा होत होती परंतु मागुन येणारा गाईड राजन सारखे पुढे दामटत होता. अखेर नाईलाजाने आम्ही चालते झालोत. तिव्र उतार संपुन आता आमची वाट ही त्या सुंदरशा नदीच्या सोबतीला चालू लागली. गुरदुंग सोडून एका तासाने आम्हाला वाहण चालेल असा पंक्का रस्ता लागला. गुरदुंग या गावाला जाण्यासाठी आम्ही आलो तोच एकमात्र रस्ता होता आणि वरपर्यंत कुठलही वाहण जात नव्हते. दुर्गम भागातील ते नितांत सुंदर ठिकाण वर पहाडात दिसेनासे झाले होते.
आता आम्ही चालत होतो त्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर होते. जेसीबी आणि क्रशरचा आवाज शांतता भंग करित होता. जंगल तोडून तिथे रस्ता बनविला जात होता. पुन्हा एकदा आम्ही आधुनिक जगात येउन पोहचलो. जंगलतोड करून चाललेल बांधकाम पाहून मला अतिशय वाईट वाटले कदाचित येत्या काही वर्षांत आम्ही आलोत त्या पायवाटेची जागा हा रस्ता घेईल आणि माणसांच्या, वाहनांच्या वर्दळीपासुन अलिप्त या जंगलाची शांतता लोप पावेल. निसर्ग संपवून विकासाचा चाललेला हा अट्टाहास क्लेशदायक आहे. विकास हा इथला फक्त निसर्गच नव्हे तर इथल्या माणसांची निरागसता, संस्कृती आणि माणूसपण सार काही हिरावून घेईल. कदाचित भविष्यात येथील जंगल, पशू, पक्षी, माणस आणि त्या माणसांची संस्कृती दर्शवनार एक संग्रहालय तयार होईल आणि तेथे आपण तिकीट काढून पॉपकॉर्न खात या गोष्टी अनुभवण्याचा प्रयत्न करू. रस्त्याने जाताना जसे आम्ही पुढे जाऊ लागलो तस जंगल संपुण चहाचे मळे दिसु लागलेत आणि घर देखील दिसू लागलित. पुढे एका ठिकाणी दोन लहान नद्यांचा संगम होता. तिथेच पुलाचे कामदेखिल चालले होते. आम्ही एक नदी ओलांडून पलीकडे गेलोत आणि थोडे वर चढलोत. वर नदीला लागूनच काही लाकडी बांधकाम केलेली हॉटेल्स होती. सकाळचे 11.00 वाजले होते आणि आम्ही श्रिखोला या ठिकाणी येऊन पोहचलो होतो. तिथेच एका हॉटेलच्या अंगणात आम्ही पडाव टाकला नदीच्या काठावर मांडून ठेवलेल्या लाकडी खुर्च्यांवर बसलोत आणि कॉफी घेतली. अवखळत वाहणार्‍या त्या नदीच्या किनारी घेतलेल्या कॉफीचा आनंद काय वर्णावा. काही वेळाने पुन्हा प्रवास सुरू झाला. थोडेच अंतर कापल्यावर त्या नदीवर एक पुल लागला. लाकडी पाट्या टाकून बनवीलेला झुलता असा तो पुल होता. हिमालयातल्या त्या जगली नद्यांवर असेच पुल बांधले जातात. पहाडात थोडा जरी पाऊस झाला तरी नदी रूद्र रुप धारण करते म्हणून ही उपाययोजना. त्या सुंदरशा पुलावर बराचवेळ फोटोसेशन करून आम्ही पुन्हा वाट धरली. दोन पहाडांच्या मधुन वाहणार्‍या नदीला समांतर असा तो वळणावळणाचा रस्ता होता. Royal Enfield गाडी बनली आहे ती खास अशा रस्त्यांसाठी, नाहीतर आपले मर्द मावळे शहरातील ट्रॅफिकने वाहणार्‍या रस्त्यावंर क्लच आणि ब्रेक ओढत तिला हाकत असतात.(केवढा हा करंटेपणा?... असो).
आता रस्त्याच्या बाजुने घरांची गर्दी वाढू लागली होती. नदीच्या बाजुने झोपडीच्या आकाराची टुमदार लाकडी घर उभारली होती आणि प्रत्येक घराच्या बाहेर कुंड्यानमध्ये विविध रंगाची फुले बहरलेली होती. लालबुंद रंगाची, गोबर्‍या गालांची ही पहाडातली माणस फुलांची फारच शैकिण असतात. हिमालयातील हे थंड अल्हाददायक वातावरण हे माणसांनप्रमानेच फुलांच्या वाढीसाठी देखिल अनुकूल आहे. मे महिन्यात महाराष्ट्रातील बर्‍याच शहरात जेव्हा पारा 40 अंशाच्या च्या पुढे असतो तेव्हा आम्ही इथे हिरवळिचा आणि गुलाबी थंडीचा आनंद घेत होतो. मी चेष्टेच्या सुरात राजनला म्हटंलो 'कभि मई मे आणा हमारे यहा महाराष्ट्रमे. 40 डिग्री मे बोहत मजा आता है. हे ऐकून तो हसतच म्हणाला ' अरे इतनी गर्मि मे तो हम मर जायेगा '. खरोखर हिमालयातील शांत, सुंदर, निसर्गरम्य वातावरणातून ही माणस रोजगारासाठी आपल्या कडिल प्रदुषण, गोंगाट , उष्णता आणि गर्दीने भरलेल्या शहरात कशी रहात असतिल. त्यात भर म्हणून आपल्यातले काही महाभाग त्यांना त्यांना चिनी म्हणून, ऊ शाबजी म्हणून चिडवतात. इथल्या लोकांच आरोग्य, शारिरीक क्षमता, संस्कृती, सामाजिक जाणीवा, देशप्रेमाची भावना सार काही आपल्या कडील शहरी so cold, self centered, selfish लोकांच्या मानाने उत्तम आहे. मग भारतीय असल्याचा अभिमान नेमका बाळगावा तो कुणी?
चालत चालत दुपारचे तिन वाजलेत तरी देखील रस्ता काही संपण्याचे नाव घेईना. आज आमच्या ट्रेकचा पाचवा दिवस होता आणि दररोज आम्ही दहा ते बारा किलोमीटर अंतर कापत होतो. कितीही कणखर असलित तरी सगळ्याचीच शरिर आता उत्तर द्यायला लागली होती. सततच्या चालण्याने कुणाच्या पायात फोड आले होते, कुणाला जखमा झाल्या होत्या तर कुणाचा पाय लचकला होता आणि यामुळे बरेच लोक लंगडत चालत होते. सह्याद्रीतले ट्रेक हे एक, दोन किंवा तीन दिवसांत संपतात इथे आमचा पाचवा दिवस चालला होता. मला खर कौतुक वाटल ते आमच्यातल्या काही जेष्ठ मंडळीच. या वयातली इतर मंडळी जेव्हा घरी पाय पसरून 'शि काय उकडतय' IPL पहात होती. तेव्हा आमच्यातले हे काही पंन्नशिच्या आसपासचे तरुण आम्हाला लाजवेल अशा उत्साहात ट्रेक करीत होते. यात महिलांची संख्या अधिक होती हे विशेष. या वयात हा शारीरिक आणि मानसिक थकवा बर्याचदा असह्य होतो. नंतर घरी पोहचल्यावर आम्हाला कळले की आम्ही प्रत्येकाने त्या पाच दिवसात अंदाजे तिन ते पाच किलो वजन कमी केले होते. तेव्हा वजन कमी करण्यासाठी ट्रेकिगसारखा दुसरा पर्याय नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो.
वाटेने चालतांना लहान लहान गोरीगोमटी मुल शाळेतून परततांना दिसत होती. आजचा रस्ता बराच रूंद होता तेव्हा आम्ही आठ दहा ट्रेकर्स मस्करी करत, फोटो घेत आणि पुढच्या ट्रेकचे मनसुबे रचत सर्वात शेवटी चालत होतो. दुपारी 3.30 च्या सुमारास आम्ही अखेर रिम्बीक येथे येऊन पोहचलो. रिम्बीक हे त्या पहाडातल बाजारपेठेच गाव होत. आम्ही हॉटेलमध्ये प्रवेश करताच ट्रेकचे व्यवस्थापक श्रिमणी सरांनी आमच हसतमुखाने स्वागत केले. ट्रेक आम्ही एकदाचा यशस्वीपणे पुर्ण केला होता. हा ट्रेक पुर्ण झाल्याचा एकाच वेळी आनंद आणि दुःख दोघही वाटत होते. अंघोळीला गरम पाणी मिळत आहे हे ऐकून आम्ही पळतच सुटलो. पटकन खोलीत सामान टाकला आणि अंघोळीला गेलो. तब्बल पाच दिवसांनी गरम पाण्याने मी अंघोळ करत होतो. तेंव्हा अंघोळीसारख्या रोजच्या क्रियेतही किती आनंद असतो याची प्रचिती आली.
रात्री जेवणापुर्वी CAMP FIRE च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्व लोक एका शेकोटीच्या भवती जमून विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम करित असतात. बाहेर पाऊस असल्याने आमचा CAMP FIRE एका हॉलमध्ये विदाउट FIRE च चालू झाला. अवघि विस मिनिटे अवधी असलेला तो कार्यक्रम आम्ही एक दिड तास खेचत नेला. आमच्या ग्रुपमधील काही तरुण मुलांना गाण म्हटलं म्हणजे हनि सींग आणि अरजित सिंगच्या पलिकडे ही काही असत हे माहीत नव्हते तर काही जेष्ठाना हनि सिंग नाव जरी ऐकले तरी प्रचंड मानसिक त्रास व्हायचा. तेव्हा दोन पिढ्यातल या द्वंद्वावर मी एक कल्पना सुचवली. दोन समुहांनी समारोपाची दोन वेगळी गित गावित असे ठरले. सर्व तरुण मुला मुलिंनी 'अच्छा चलताहू दुवाओमे याद रखना' हे गित गायल तर जेष्ठानी 'कभि अलविदा ना केहना '. ती आमच्या ट्रेकची अखेरची रात्र होती आणि वातावरण खरोखर भाऊक झाले होते. तेव्हा मैफील थोडी हलकी करावी म्हणून सुजीतने जोरजोरात तुम तो ठेहरे परदेसी गायल त्यात माझ्यासकट सर्वानिच सुर मिसळला आणि हसत खेळत मैफिलीचा अंत झाला. रात्रिच जेवण अप्रतिम होत. गंप्पा मारत, हसत आम्ही जेवण आटोपलीत आणि बाहेर निवांतपणे बसलोत आमचा ट्रेक खरोखर संपला होता आणि एक प्रकारची हुरहुर लागून राहिली होती. मागच्या एक महिन्यापासून मला ज्या ट्रेक शिवाय काहीही सुचत नव्हतं तो ट्रेक अखेर संपला होता. उद्या गाडीने दार्जिलिंगला पोहचून परवा सकाळीच आम्ही घराकडे निघणार होतो.
रात्री बिछान्यात मी कॅमेर्‍यातील फोटो पहात पडलो होतो. प्रत्येक फोटो सोबत कितीतरी माणसे, ठिकाण, घटना यांच्या आठवणी बंदिस्त झाल्या होत्या. माझ्या मनात विचार आला प्रवास ही खरोखर किती अद्भुत गोष्ट आहे. प्रत्येक दिवशी नविन माणस, नविन ठिकाण, नवा निसर्ग अनुभवन याहूनही सुंदर काही असत का. त्यातच ट्रेकिग विषयीतर काय बोलावे. पहाड, नद्या, जंगल, माळराण यातुन पाई चालतांना मिळणाऱ्या आनंदाची सर अजुन कुठल्याही प्रकारच्या पर्यटनातून मिळने केवळ अशक्य आहे. ट्रेकिगमध्ये आपण निसर्गाशी खर्या अर्थाने तादात्म्य पावतो, एकरुप होतो. ट्रेकमध्ये पडणारे श्रम हे देखील आनंददायीच असतात. प्रचंड परिश्रमानंतर शिखर सर करण्याची ती भावना तर अवर्णनीय आहे. प्रसंगी मरणाचे भयदेखिल शिखर सर करण्याचे हे आकर्षण थोपवू शकत नाही. ट्रेकिगबंद्दल अस म्हणतात की *It is not mountains we conquer but ourselves.*
पहाडांची ती विशालता आपल्याला नम्र बनविते, ट्रेक मधले परीश्रम कणखर, सहनशील बनवितात आणि तो निसर्ग उत्कटता देतो. जगाला दाखविण्यासाठी नव्हे तर जग अजुन स्वच्छपणे बघण्यासाठी ट्रेक करायला हवेत. माझा असा अनुभव आहे की प्रत्येक ट्रेक नंतर ट्रेकिंगची ती झिंग अजुन अजून चढतच जाते, हे वेड आपल्या मनाचा ताबा घेते. वैयक्तिक पातळीवर बोलायच झाले तर ट्रेकिग हे मी स्वतासाठी निवडलेले व्यसन आहे.
रोजच्या जगण्याचा कटकटी, चिंता, समंस्या कुणाला नाहीत. या सार्‍यातून येणारी मरगळ असल्या पर्यटनातून नाहीशी होत असते. परंतु त्यासाठी Tourist बनून
नव्हे तर Traveler बनुन पर्यटन करायला हवे. जगण्यातला कटकटी या रोजच्याच असतात परंतु आठवणी बनविन्याची संधी आपल्यालाच निर्माण करावी लागते. प्रवास हा सुरवातीला आपल्याला निशब्द करतो आणि नंतर याच भावना शब्दरूप होऊन कागदावर पाझरू लागतात. प्रवासवर्णन हि ठरवून किंवा आठवून लिहावी लागत नाही तर हे लिखाण काळजात बंद आठवणिना वाट मोकळी करून देण असत, म्हणून ते वाचनार्यालाही आनंद देत आणि लिहीनार्यालाही. हिमालयातील संदकफू हे ठिकाण जस मला उमगल तस मी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु कुठल्याही लेखातून, फोटोतून, व्हिडिओतून त्याची पुर्णपणे अनुभुती मिळणे अशक्य आहे. म्हणून मी म्हणेन 'Don't listen what I say, just go & see'.
या आधीच्या प्रवास वर्णनांनप्रमाने संदकफू डायरी मी स्वतासाठीच लिहिली होती. सहजच Facebook, What's app वर टाकली आणि येणार्‍या प्रतिक्रियांमधून चक्रावून गेलो. कितीतरी ओळखिच्या तसेच अनोळखी व्यक्तींनी लिखाण आवडले असे कळविले आणि पुढिल भाग लवकर टाकण्याचि विनंती केली. खरतर मी अतिशय आळशी प्राणी आहे परंतु या लिखाणाची आपण वाट पहात आहात याच गोष्टीने आणि आपल्या अभिप्रायानी मला लिहीते केले आणि केवळ दोन भागात संपविण्याचा हेतूने सुरू केलेली लेखमाला सहा भागापर्यंत ओढता आली. आपणासर्वोचा मी खरोखर आभारी आहे. परंतु मला हे प्रामाणिकपणे वाटते की लिखाणाला मिळालेली ही पावती लिखिणापेक्षा आपल्या सर्वाच्या मनातील पर्यटनासाठी च्या आकर्षणाची आहे. शेवटी आपल्या सर्वांच्या आत एक जिप्सी दडलेला असतोच. ज्याला सतत प्रवास करावासा वाटतो, नव काही अनुभवावस वाटत आणि हे अस वाटन हेच जिवंतपणाच लक्षण आहे कारण अस म्हणतात...
*TO TRAVELL IS TO LIVE...*
आपलाच ट्रेकर
*विनय पाटिल*

*माझे ट्रेकानूभव...संदकफू डायरी...भाग पाच

चवथा दिवस :
'अबके हम बिछडे तो शायद कभि ख्वाबोमे मिले
जिसतरह सुखे हुए फुल किताबो मे मिले,
गम-ए-दुनीया भी गम-ए-यार मे शामील करलो
नशा बढता है जो शराबे शराबो मे मिले. '
आपल्या प्रिय व्यक्तीच्या विरहप्रसंगाची जी अगतिकता' अहमद फराज' या महान शायराने वरिल शेरात व्यक्त केली आहे अगदी त्याच अगतिकतेने आम्ही संदकफू हे ठिकाण दिनांक 19 मे 2017 या दिवशी सकाळी 8.30 वाजता सोडले. एव्हरेस्ट, काचंनजंगा, माकालू, लोहत्से, पंडिम अशी हिमालयातील उंत्तूग शिखरे याची देही याची डोळा आम्ही आज सकाळी सकाळीच येथुन पाहीली होती. स्वप्नपूर्तीच्या भावनेनेच आम्ही आमचा आजच्या प्रवासाला सुरुवात केली. आजची आमची वाट ही घनदाट आरंण्यातून जाणारी अरुंद उताराची पायवाट होती. कुठल्याही ट्रेकमध्ये अपघाताचा आणि दुखापतिचा सर्वात अधिक धोका हा उतरतांना असतो. एव्हरेस्ट मोहिमेतील गिर्यारोहकांचे सर्वात जास्त म्रूत्यू हे उतरतांना झाले आहेत यावरून वरील विधानाचे मर्म लक्षात यावे.
उतरणीचा रस्ता पाहून सुरवातीला आमचा वेग बराच होता. पायवाटेने तो पहाड उतरतांना आम्हाला वेगळाच उत्साह जाणवत होता. सुरवातीला उंचच उंच पसरलेल्या व्रुक्षांची जागा आता डोक्याएवढ्या बांबूच्या वनाने घेतली. मधेमधे रान मोकळ होउन चहोदुर पसरलेल्या हिमालयातील रांगा दर्शन देत होत्या. मध्येच रानफुलांनी बहरलेल एखाद सुंदर झाड नजरेस पडत होत. झाडांच्या पानावर दवबिंदू साचले होते आणि संपुर्ण रानातुनच ओलावा पाझरत होता.
ट्रेक करतांना प्रत्येकाचा आपला एक वेग असतो आणि प्रत्येकाने आपल्याच वेगाने चढायला आणि उतरायला हव. सुरक्षेच्या कारणाने सक्तीने सर्वाच्या सोबत समुहाने चालण्यात आपण ट्रेकचा आनंद घालवतो अस माझ प्रामाणिक मत आहे. साधारणपणे तासाभरात सर्व ट्रेकर्स मध्ये बरच अंतर पडल. आमच्यातली काही मंडळी बरिच पुढे गेली होती. मी त्यांच्या मागोमाग थोड्या कमी वेगाने उतरत होतो. 2012 साली मी आणि सुजीतने भर पावसात कळसूबाईचा ट्रेक केला होता. ज्यात उतरतांना पावसामुळे आमच्या पायवाटेचा अक्षरशः ओढा झाला होता. त्या अतिशय घसरड्या पायवाटेवर मी पाठीवर जड बॅग असताना नऊ ते दहा वेळेला पडलो होतो आणि काही ठिकाणी तर चंक्क घसरगुंडी प्रमाणे घसरत खाली आलो होतो. पडतझडत कसेतरी आम्ही खाली पोहचलो होतो आणि या सर्वात माझ्या डाव्या पायाच्या गुडघ्याला जबर मार लागला होता. ही दुखापत एवढि वेदनादायी होती की भविष्यात आपण कधि कुठला ट्रेक करणार की नाही असा प्रश्न मला त्यावेळी पडला होता. या अनुभवातून ट्रेक करतांना knee cap वापरण्याच आणि सावकाश उतरण्याच शहाणपण मला आल.
आतापर्यंत माझ मागच्या आणी पुढच्या मंडळीपासुन बरच अंतर पडल होत. बर्याच वेळापासुन मी एकटाच चालत होतो. या अशा वाटेवर एकट चालतांना मला जर कुठल्या प्राण्यांपासून खरोखर धोका होता तर ते म्हणजे अस्वल. अस्वल हा अतिशय आक्रमक प्रणि असतो तो एकट्या दुकट्या व्यक्तीवर हंल्ला करतांना कचरत नाही हे मला माहीत होतं. मी सुरक्षेसाठी वाटेतच वाळलेल्या एका बांबूची काठी हातात घेतली. माझ्या डोक्यात विचार आला जर खरोखरच झाडीतून अचानक अस्वल समोर आल आणि त्याला जर का बोलता आल तर माझ्या हातातली काठी पाहुन ते हसुन म्हटल असत "अस्वल के तापसे तुम्हे कोई बचा सकता है तो एकही चिज खुद अस्वल हा हा हा".परंतु तरीही उगाच स्वताच्या खोट्या समाधानासाठी मी ती काठी घेऊन चालू लागलो.
पुढे काही अंतरावर थोडा मोकळा परिसर लागला. गुडघ्या एवढ्या गवतात पुढे गेलेली मंडळी आरामाने पडली होती. त्यांना पाहुन बर वाटल. इथे आम्हाला मागुन येणार्‍याची वाट पाहत थांबायचे होते. पाणी पिऊन आणि उशाला बॅग घेऊन मि देखील आडवा झालो. परंतु काही क्षणातच गवतातील किड्यांनी कपड्यात, काणात घुसून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली त्यामुळे पुन्हा उठून बासावे लागले. 20 मिनिटे झालीत तरीही कुणी येण्याची चिन्हे दिसत नव्हती. आम्ही खान्याच्या वस्तू बाहेर काढल्यात आणि किड्यांमधुन मिळनारा प्रोटिन्सयुक्त आहार टाळत नाश्ता संपवला. अर्ध्या तासाने काही ट्रेकर्स आम्हाला येउन मिळालेत त्यानंतर एक दोन करत पाउन तासात सर्व मंडळी त्या मोकळ्या जागी जमली. मागुन येणाऱ्या काही ट्रेकर्सनी आपल्या पिलासह बसलेले अस्वल पाहिल्याचे सांगितले. म्हणजे मी मघाशी केलेल्या गोष्टी केवळ कल्पनारंजन नव्हत्या मी स्वताशिच म्हणालो आणि चालू लागलो.
मागच्या अडीच तिन तासांपासून आम्ही उतरत होतो आणि उतरतांना बुटात पुढे दाबली जाणारी पायाची बोट आणि पोटर्या आता दुखायला लागल्या होत्या. चरबीचे थरावर थर असलेल्या मंडळींना अधिक समंस्या जाणवत होत्या. आतापर्यंत आम्ही सहा किलोमीटर अंतर कापले होते अजून इतकेच अंतर आम्हाला कापायचे होते. वाटेतल्या रानफुलांचे आणि निरनिराळ्या वनस्पतीचे फोटो घेत आम्ही उतरू लागलो. माझ्या डाव्या गुडघ्याच जुने दुखणे हळूहळू डोके वर काढू लागले तसा मी वेग अजूनच कमी केला. इथे पायाला काही दुखापत झाली असती तर झोळीत टाकून इतरांच्या खाद्यावरूनच त्या व्यक्तीला खाली नेता येणे शक्य होते एवढ्या आडवाटेने आमचा प्रवास चालला होता. विकासापासून तो प्रदेश अस्पर्शीत होता आणि म्हणूनच एवढा सुंदर होता.
दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास उतारावर काही लाकडी घर दिसु लागलीत ते दुष्य पाहून जिवात जिव आला. वाटेत एका भल्या मोठ्या शिळेला लागुन एक लाकडी बाक दिसला तिथेच मी आणि सुजीतने बॅग टेकवल्यात आणि विश्रांतीसाठी बसलोत. काही वेळाने आमच्या मागून एक तरुण जोडप आणि त्यांच्यासोबत उतरणारा एक स्थानिक गाईड दिसला. तेही आमच्या समोरच्या दगडावर येउन बसलेत. नेहमीप्रमाणे मी चौकशी केली तेव्हा कळले की सलमान चैधरी नाव असलेला तो युवक व्यवसायाने डॉक्टर होता आणि फराह हि त्याची मैत्रीण एग्रिकल्चर इंजिनिअर होती. हे दोन्ही मुळचे असामचे रहिवासी होते आणि फक्त दोघेच त्या गाइडच्या सोबतीने हिमालयातील दर्याखोर्यातून भटकंती करत होते. मागच्या चार दिवसाच्या प्रवासात फक्त हे दोघेच आम्हाला पाइ चालतांना वाटेत भेटलेत यावरून त्या निर्मनुष्य भागाची कल्पना यावी. मला त्या जोडीचे फार कौतुक वाटले. गर्दीने भरून वाहणारी भारतातली इतर पर्यटन स्थळ सोडुन हे लोक असुविधानी भरलेल्या हिमालयातून भटकत होते. नक्कीच इतरांच्या तुलनेत जागाकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता.
मला प्रवासात भेटणारी अशी निरनिराळी माणस आणि विशेष म्हणजे त्या माणसांचे जगाकडे पाहण्याचे निरनिराळे दृष्टीकोन फारच आकर्षित करतात. पर्यटनात आपण खरे श्रीमंत होतो ते इथे. अस माणस वाचुन श्रीमंत होण्यासाठी आपले परकेपणाचे, शिष्टाचाराचे चष्मे काढुन ठेवावे लागतात आणि मोकळ व्हाव लागत. जे AC च्या प्रवासातून, लक्झरीयस हॉटेलात राहुन आणी महागड्या टुर पॅकेजेस मधुन शंक्य होत नसत. प्रवासातला साधेपणा आणि असुविधा अस मोकळ होन सोप बनविते. आपण नाही का एसटी च्या प्रवासात ती सुरळीत चालत असते तो पर्यंत आपल्याच मोबाईल मध्ये मग्न असतो. शेजारच्या सहप्रवाशाशी चुकुन देखिल बोलत नाही. परंतु तिच एसटी पंचर होऊन थांबते तेव्हा महामंडळाला शिव्या देण्याच्या मुद्द्यांवरून का असेना एकदुसर्याशी बोलते होतो. माझा असा अनुभव आहे की प्रवासातल्या या असुविधाच त्या प्रवासातल्या गोड आठवणींचा ठेवा मागे ठेउन जातात. अस म्हणतात की *' You can always make money, but you can't always make memories '*.
दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास आम्ही गुरदुंग या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलोत. गुरदुंग हे पहाडाच्या उतारावर ठराविक अंतरावर वसलेल्या लाकडी घरांचे गाव आहे. दुरवर पसरलेल्या हिमालयातील पहाडांच्या रांगा, उतारावरील टुमदार लाकडी घर, घरांच्या भवती परसात फुललेली विविधरंगी फुलं,बाजुलाच पहाडातुन आवाज करत वाहणारी नदी, वाटेने उगवलेली करवंदाच्या आकाराची आंबट गोड लालबुंद स्टॉबेरी, हवेतून वाहणारा गुलाबी गारवा, माझ्या उभ्या अयुष्यात मी पहाडातल एवढ सुंदर ठिकाण पाहिल नव्हत. आमच्या ट्रेकच्या प्रत्येक ठिकाणाच वैशिष्ट्य वेगळ होत. टम्बलिंगच घर सुंदर होत, कालीपोखरीचा सुर्यास्त सुंदर होता, संदकफू येथुन दिसणारी शिखर सुंदर होती परंतु गुरदुंगच निसर्ग सैदर्य अवर्णनीय होत. पाहताक्षणी प्रेमात पडाव एवढ सुंदर हे ठिकाण होत.
चार बाजूला बांधलेली लाकडी घर आणि मधोमध हीरव मोकळ अंगण अशा सुबक रचनेचे आमचे आजचे हॉटेल होते. दुपारी जेवण करुन आम्ही थोडा आराम केला आणि संध्याकाळ मजेत शेरोशायरी आणि गझलेच्या मैफीलत घालविली. चोहीकडे जेवढा सुंदर निसर्ग होता तेवढिच आमच्या समूहात काही दर्दी माणसे देखिल होती. मराठी माणूस म्हणजे 'गाणे आणि खाणे' या दोन गोष्टीवर आमच्या प्रमाणेच प्रेम करणारी माणसे या ट्रेकमध्ये आम्हाला लाभलीत. ज्यात धुळेकर डॉ. संजय चित्ते होते तसेच त्यांच्या पत्नी आणि अनेक कलात निपुण सौ. रुपाली चित्ते होत्या. डॉक्टर चित्तेंची कंन्या आर्किटेक्ट आणि उत्कृष्ट फोटोग्राफर सृष्टी होती. औरंगाबादचे व्यवसायाने शिक्षक असलेले पवार दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा संकेत होता. नाशिकच्या नावाजलेल्या चित्रकार सौ. अर्पणा चौगुले होत्या, मंगल सोनवणे होत्या , धुळेकर डॉ. सौ. मनिषा भावसार होत्या आपल्या दोनही मुलांसोबत आलेल्या सौ. प्रेरणा बोरसे होत्या, शांत आणि हसमुख कॉलेजकुमार दर्शन होता, अवघ्या 13 वर्षे वयाचा परंतु प्रचंड कणखर असा अभिषेक होता, हुशार आणि कुतूहलाने भरलेला रोहण होता, अतिशय समजदार आणि सालस अशि सई होती, सेल्फिक्विन साक्षी होती, जय- विरू असे रोहण आणि ऋतूज होते सदैव मदतीस तत्पर असा कौस्तुभ होता, हॅपी गो लकी राज होता, आणि सोबत माझ्या प्रत्येक ट्रेकचा पार्टनर सुजित होता. असा आमचा बराच मोठा समविचारी लोकांचा गोतावळा जमला होता.
रात्री जेवणानंतर आम्ही काही तरूण मंडळी बाहेर पाउस चालू असतांना एका झोपडीत शेकोटिची उब घेत बसलो होतो. आजचा प्रवास सुंदर होता परंतु उद्या आमच्या ट्रेकचा अखेरचा दिवस होता. मागच्या चार दिवसांपासून मोबाईलला रेंज नसल्याने जगाशी जवळपास आमचा संपर्क तुटला होता. या ट्रेकमध्ये सहभागी झालेली मंडळिच मागच्या काही दिवसांपासून आमच विश्व होत्या. आमच्यात असलेल्या सर्व औपचारिकता आता गळुन पडल्या होत्या सर्वच एकमेकांना सांभाळून घेत होते. उद्या हे सर्व संपणार होत. बरिच रात्र झाली तरी कुणाचाही पाय निघत नव्हता. आपापल्या अयुष्यातल्या समस्या, चिंता, कटकटी विसरून सारे इथे जमले होते आणि रंगात आलेली ही मैफिल कुणालाही सोडवत नव्हती. त्या रात्री मला उगाच गुलजार यांच्या या ओळी सारख्या सारख्या आठवत राहिल्या ...
दिल ढुढता है फिर वही फुरसत के रात दिन,
बैठे रहे तसंब्बुरे, जाना किये हुऐ...
*To be continued...*

*माझे ट्रेकानूभव....संदकफू डायरी...भाग चार

" The poetry of earth is never dead" असे John Keats या ब्रिटिश कविचे प्रसिद्ध वांक्य आहे. निसर्गातली हवा, वाहत पाणी, किलबिलाट करणारी पाखरे याचां आवाज हा कधिही थांबत नसतो. या ओळिची अनुभुती घेण्यासाठी हिमालयासारख दुसर ठिकाण नाही. 18 मे 2017 या दिवशी पहाटे जाग आली ती कावळयांच्या अतिशय तिव्र काव काव या आवाजाने. खिडकीतून बाहेर दिसणारे आपल्याकडिल कावळ्यांंच्या दुप्पट आकाराचे आणी केसांचे दाट आवरण असणारे हे हिमालयातील कावळे होते.
बाहेर उजाडलच होत तेव्हा ब्रश करुन चहा घेतला. अंघोळीचा तर प्रश्नच नव्हता. तिन दिवसांपूर्वी दार्जिलिंग सोडतांना शेवटची अंघोळ झाली होती. हिमालयातील या दुर्गम ठिकाणी आधिच पाण्याची कमतरता असते. त्यात एवढ्या लोकांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळणे केवळ अशक्य आणि एवढ्या थंडीत गारपाण्याने अंघोळ करणारा कुणीही योगिपुरूष आमच्यात नव्हता.
सकाळी 7.00 वाजेच्या सुमारास बाहेरच धुक निवळल आणि स्वंच्छ सूर्यप्रकाश पडला. समोरच्या एका टेकडीवर चढल्यावर आम्हाला आज जिथे पोहचायच होत ते संदकफू हे ठिकाण दिसत होत. आज आम्हाला फक्त सात किलोमीटर अंतर चालायचे होते. म्हणून सारे काही निवांत चालले होते.
सकाळी 8.00 वाजेच्या सुमारास आम्ही कालीपोखरी सोडून संदकफूला जाणाऱ्या वाटेला लागलो. सुरवातीला थोडा चढ लागला नंतर मात्र रस्ता बर्‍यापैकी सपाट होता. आमच्या एका बाजूला पहाड होते तर दुसरीकडे खाई. काही अंतर चालून गेल्यावर रस्त्याच्या कडेला काही लाकडी घर दिसलीत. बाहेर एक वयस्कर स्री आपल्या पाठीवर दगडांनी भरलेली थैली खालून आणुन अंगणात टाकत होती. हे पाहून गारच पडायला झाले. आम्ही ट्रेकिंग म्हणून जे काही करीत होतो ते इथल्या लोकांचे रोजचे जगणे होते.
साधारणपणे तिन किलोमीटर अंतरावर भिखाय भंजन हे ठिकाण आले. या ठिकाणाची उंची होती 3280 मिटर्स. इथे एक चबुतर्यासारख बुद्ध प्रार्थना स्थळ होत. थंडी बर्‍यापैकी जाणवत होती. काही वेळ विश्रांती करून पुन्हा चालायला लागलोत. आता चढ अतिशय तिव्र होता आणि हवेतील आॅक्सिजनच प्रमाणही कमी झाले होते. थोडस चालल तरी थकवा जाणवत होता. हवा अतिशय वेगाने वाहत होती आणि झाडानमधुन वाहताना तिचा आवाज भयावह वाटत होता. धुकेही दाट होते. रात्रीच काय परंतु दिवसाही कुणी एकट येण्यास धजनार नाही असा तो निर्मनुष्य रस्ता जाणवला. पुढे काही अंतरावर आम्हाला मुक्तपणे चरणारे याक दिसलेत. आम्ही याक हा प्राणी पहिल्यांदाच पहात होतो म्हणून फोटो घेण्यासाठी धावलो. आम्हाला येतांना पाहून ते अजून लांब धावलेत. कदाचित ते देखिल आमच्या सारखे प्राणी पहिल्यांदाच पहात असावेत. दाट धुक्यातून मजल दरमजल करत आम्ही चालू लागलोत आणि दुपारी 1.00 वाजेच्या सुमारास संदकफू येथे येऊन पोहचलोत. या ठिकाणाची उंची होती 3636 मिटर्स. आम्ही अखेर पश्चिम बंगाल राज्यातील सर्वात उंच ठिकाणी येऊन पोहचलो होतो. संदकफू हे पहाडांवर चढ उतारावर वसलेले आठ दहा लाकडी घरांच एक सुंदर ठिकाण आहे. याठिकाणी मध्यभागी भारतीय सेनेचा एक तळ आहे आणि त्याला लागूनच चढावर ठराविक अंतराने पर्यटकांसाठी बनविलेली लाकडी हॉटेल्स आहेत. आमची व्यवस्था एका तिनमजली लाकडी हॉटेलमध्ये करण्यात आली होती. चालून चालून आम्ही थकलो होतो. तेव्हा पटकन रूम ताब्यात घेतली कपडे बदलले, जेवण केले आणि मस्तपैकी झोप काढली. दुपारी 4.00 वाजेला सुजीत, डॉ. चित्ते, जॉय आणि मी आम्ही चौघेजण बाहेर पडलोत. बाहेर प्रचंड थंडी होती. आम्ही एका सुंदरशा लाकडी हॉटेलमध्ये चहा घेतला आणि फेरफटका मारावा म्हणून चालायला लागलोत. काही अंतर चालल्यावर फुलांनी बहरलेला परिसर लागला तेथे काही फोटो घेतलेत. तिथे जवळच असलेल्या टेकडीवर आम्हाला काही झेंडे दिसलेत. ते बौद्ध धर्माचे एक प्रार्थना स्थळ होते तिथुन नजारा अजून सुंदर दिसणार या कल्पनेने मी आणि सुजीत अतिशय अरुंद वाटेने वर चढलो. बहूतेक संदकफू येथिल ते ते सर्वात उंच ठिकाण होते. आम्ही होतो त्यापेक्षा दुसर कुठलही ठिकाण आम्हाला उंच दिसत नव्हते. शिखरावर असण्याची ती भावना अद्वितीय स्वरुपाची होती. 3636 मिटर्स उंची असलेल्या टेकडीवर जर अस वाटत असेल तर MOUNT EVEREST शिखरावरून काय वाटत असेल याची कल्पना केलेलीच बरी.
या उंच टेकडीवर हवेपासुन बचावासाठी कुठलाच आडोसा नव्हता आणि वेगाने वाहनारे गार वारे चांगलेच बोचत होते. स्थानिक नेपाळी भाषेत संदकफू या शब्दाचा अर्थ 'संदक-गार आणि फू - हवा' असा होतो. आणि हे ठिकाण आपल्या नावाला चांगलच जागत होत.
इथे अधिक वेळ थांबन कठीण होणार होत परंतु येथूनच आम्हाला दिसणार होती हिमालयातील काही अतिउंच्च शिखर. समस्या फक्त एकच होती चहोदुर पसरलेल्या दाट धुक्याची. आम्ही चितेंत होतो जे शीखर पाहण्यासाठी आपण इथे आलोत ते आपण वास्तवात पाहू की पुन्हा घरी जाऊन गुगल इमेजेस मध्येच पाहू हे आम्हस ठाउक नव्हते. आमचा मार्ग काढत काही वेळाने ग्रूपमधले इतर काही ट्रेकर्स आम्हाला येउन मिळाले. काही वेळाने आम्हाला वर चढलेल पाहून इतर दोघ तिघही आलेत. मी सहजच ' कहासे ' म्हणून विचारले तर त्यातला एक म्हणाला 'ढाका, बांग्लादेश'. ते विदेशी आहेत हे एकुण मला चेव आला. मी आठ दहा प्रश्न त्यांना एका श्वासांत विचारून टाकलेत. त्याच्यातला एक माझ्या सारखाच गंपिष्ठ निघाला. मग काय बांग्लादेश क्रिकेट टीमने नेमक कुणाला खेळवायला हव इथपासून ते बाहुबली का पहावा इथपर्यंत अनेक संल्ले मी या माझ्या बांग्लादेशी मित्रांना देउन टाकलेत. त्याचा परतावा म्हणुन की काय त्यानिही काही बांग्लादेशी चलणि नोटा आम्हाला आठवण म्हणून देउ केल्यात त्यांनाही लगेच घेउन टाकल्यात. त्यांच्याशी त्या थोड्या वेळात केलेल्या संभाषणावरून जाणवले की वेगळा धर्म आणि वेगळी भाषा असलेली हि विदेशी माणस अगदी आपल्यासाखिच आहेत. तेही आपल्या प्रमाणेच हिमालयाच्या भेटीला आली आहेत आपल्या देशाच्या सिमा ओलांडुन.
धुक काही हटण्याच नाव घेइना तेव्हा अधांर पडायला लागल्यावर वैतागून आम्ही खाली उतरलो आणि हॉटेलला आलो. रात्री जेवण करून लवकर झोपलो परंतु झोप काही येईना. सु सु करत प्रचंड आवाज करत वाहनारे वारे खिडकितल्या फटीतून सरळ आत येत होते.
रात्री उशिरा डोळा लागतो नलागतो तोच पहाटे 4.00 वाजेला जोरदार शिट्टीच्या आवाजाने झोपमोड झाली. सूर्योदय पहाण्यासाठी जॉय सर्वाना उठवत होता. मी बाहेर येऊन पहिल तर सुंदर चांदण पडल होत. मी आनंदाने धावतच कॅमेरा घेण्यासाठी आत जाउन येतो तो काय पुन्हा धुक.'इस तरह के बिहडोमे पलक झपकतेही मोसम के हालात बदल सकते है' हे बेअर ग्रिल्सच वाक्य पुन्हा आठवल. बाहेर हाड गोठवणारी थंडी पडली होती. नंतर कळल की हिवाळ्यात सकाळी 9.00 वाजेपर्यंत बिछान्यात लोळनारे आम्ही सूर्योदय पहाण्यासाठी त्या दिवशी एक डिग्री सेल्सिअस तापमानात पहाटे 4.00 ला उठलो होतो. धूक हटत नव्हत आणी थंडी सहण होत नव्हती म्हणून आम्ही पुन्हा एकदा रुमला आलोत. झोपेच खोब्र झालच होत तेव्हा मी उगाच कॅमेरातले फोटो पहात बसलो आणि थोड्याच वेळात खिडकी बाहेर चंक्क सुर्यकिरण दिसलेत. मी तसाच धावत बाहेर आलो आणि सनराइज पॉईंटला पोहचलो 19 मे 2017 ची ति सकाळ आमच्यासाठी अविस्मरणीय नजारे घेऊन आली होती. पूर्वेला सुर्य वर आला होता, ढग पुर्णपणे नाहिसे झाले होते आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात काचंनजंगा हे हिमाच्छादित शिखर चमकत होत. आमच्या ह्रदयाचे ठोके वाढले होते आणि आनंदाने आम्ही चंक्क ओरडत होतो.
काचंनजंगा हे शिखर आपल्याला एकाच वेळी कुंभकर्ण आणि पंडिम या दोन शिखांराच्या सोबत दिसत. या शिखरांच्या आकारावरून कुणितरी व्यक्ती झोपली असल्याचे भासते. स्थानिक लोक यालाच स्लिपिंग बुद्धा म्हणून ओळखतात. 8586 मिटर्स उचिंच हे शिखर चढाईसाठी जगातील सर्वात कठीण शीखर म्हणून ओळखले जाते. या शिखरांच्या डावीकडे तिन शिखरांचा एक समुह दिसतो ज्याला थ्री सिस्टर्स म्हणून ओळखतात. आणि याच्याच थोडे डावीकडे दिसते लोहत्से आणि मकालू या दोन शिखरांच्या मधोमध आहे जगातील सर्वात उंच शिखर MOUNT EVEREST.
EVEREST वरच एडमंड हिलरी यांच :शिखरावरून' बेअर ग्रिल्सच 'मड, स्वेट, टिअर' अशी काही पुस्तके आणि कितीतरी डॉक्युमेंटरी आणि सिनेमे मी पाहीले होते. कितीतरी गिर्यारोहक जे शिखर सर करण्याच स्वप्न घेऊन जगलित आणि मेलित ते शिखर मी डोळ्यांनी पहात होतो.
हिमालयातील हि उत्तुंग शिखर आपल्याला उन्नत करतात, प्रेरणा देतात. जे अस्तित्व आणि ज्या चिंता घेऊन आपण जगतो ते सार किती क्षुद्र आहे याची जाणीव करून देतात. निसर्गाच हे विराट रूप पाहून माणूस थक्क होतो, स्तंभित होतो, आत्ममग्न होतो. प्रत्येक व्यक्तीने मानवनिर्मित आश्चर्य पाहण्याऐवजी निसर्गातली हि आश्चर्य बघावित अस मला मनापासून वाटत. कारण मानव निर्मित आश्चर्य हि प्रत्येक कालखंडात बदलत असतात परंतु निसर्गातील हि आश्चर्य हजारो वर्षांपासून तशीच आहेत अविचल, अभेद्य, स्वप्नवत ज्यांना पाहुन हिंदीतल्या कुठल्याशा लेखकाच्या या ओळी आठवतात 'मेरा स्वप्न है के मे स्वप्न देख सकू'...
मी शक्य तेवढे ते क्षण कॅमेर्‍यात टिपण्याचा प्रयत्न केला आणि नाईलाजाने हॉटेलला आलो. आम्ही खुष होतो कारण आमचा इथे येण्याचा हेतू सांध्य झाला होता. आता पुढच्या दोन दिवसात वेगळ्या सुंदर वाटेने खाली उतरायचे होते. परंतु ट्रेकिंग मध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी. चढणा आसान है उतरना मुश्किल...
*To be continued*

माझे ट्रेकानूभव...संदकफू डायरी...भाग तिन

दुसरा दिवस : ' Mountains are calling & I can't wait ' असल भारी वाक्य WhatsApp status म्हणून अपलोड करुन मी ट्रेकसाठी घरून निघालो होतो. परंतु जेव्हा पर्वत आपली परिक्षा घ्यायच ठरवतात तेव्हा आपल नेमक काय होत हे आम्हाला आज कळनार होत. 
दिनांक 17 मे 2017 या दिवशी सकाळी तयार होऊन आणी दुपारचे जेवण सोबत घेऊन आम्ही बाहेर पडलोत. 47 ट्रेकर्स मधिल काही पहिल्या दिवसाच्या चालण्यानेच प्रचंड थकले होते. त्यांना गाडीने रात्रीच्या मुक्कामी हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. सकाळी ठिक 7.00 वाजता आम्ही चालायला सुरुवात केली आणि टम्बलिंग सोडल. धुक निवळल होत आणि स्वंच्छ सूर्यप्रकाश पडला होता. काल रात्री दाट धुक्यात इथे पोहचलो तेव्हा मी दमुन रस्त्याच्या कडेला बसलो होतो. सकाळी ती जागा पाहिली तेव्हा भितीने उडालोच. प्रचंड खोल आणि विस्तीर्ण दरी रस्त्याला लागुन होती आणि मी रात्री चंक्क तिच्यात पाय टाकून बसलो होतो. 'नजर हटी, दुर्घटना घटी' ' कशाला म्हणतात हे मला तेव्हा जाणवले. 
आम्ही आज हिमालयातील ज्या वळनावळनाच्या रसत्याने जात होतो तोच रस्ता भारत आणि नेपाळ या दोन देशांना वेगळ करणारी सीमारेषा होती. हे ऐकून गंमत वाटली. जावेद अख्तर यांच्या ओळी सहजपणे आठवल्यात "पंछि नदिया पवनके झोके, कोइ सरहद्द क्या इन्हे रोके '. 
साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर आम्हाला BSF चि एक चैकी लागली. भारत आणि नेपाळ सिमेवर पसरलेल्या सिंगालिला नॅशनल पार्कची ती चेकपोस्ट होती. तेथील एका हसतमुख भारतीय अधिकाऱ्याने आमचे स्वागत केले. येथे आमची प्रार्थमिक चौकशी करण्यात आली. येथे फोटो काढण्यास मनाई असुनही काही महाभागांनी ते काढलेच. (त्यातला एक मी देखील होतो.)
सिंगालिला नॅशनल पार्क हे हिमालयातील वनस्पतींसाठी आणि रेड पांडा या दुर्मिळ प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. आम्हाला रेड पांडा पहाण्याची उत्सुकता होती परंतु वंन्यप्राणी हे अतीशय सजग असतात. थोडीदेखील चाहूल किंवा वास ते चटकन टिपू शकतात. छलावरण तर असे की बर्याचदा समोर असुन देखील आपण त्यांना ओळखू शकत नाही. शिवाय आमचा समुह मोठा होता आणि चालण्यातून निर्माण होणारी कंप्पन ही वंन्यजीवांना सहज जाणवनार होती. तसेच आजच अंतर जास्त असल्याने भरभर चालन गरजेच होत. 
वळनवाटा घेतांना सुरवातीला आम्हाला उतार लागत होता. काही ठिकाणी तर उतार एवढा तीव्र होता कि चालण सोडून चंक्क धावावे लागत होते. परंतु ट्रेकिंग करतांना उतारावरच अधिक काळजी घ्यावी लागते. पाठीवरील बॅगचा आणि संपुर्ण शरिराचा भार हा गुडघे आणि पावलांवर येत असतो आणि अशातच वेगाने उतरतांना पाउल तिरप पडल तर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही. काही अतिउत्साही ट्रेकर्स हसत खिदळत उतरत होते. परंतु त्यांना हे कदाचित माहित नसावे 'जो रास्ता निचे जाता है वही उपरभीतो आता है.' 
आज सकाळपासून सुर्यदेव आमच्यावर खुष होते. आम्ही समुद्रसपाटीपासून 2500 मीटर उंचीवर चालत होतो तेव्हा गारवा हा असणारच होता. परंतु चालल्याने शरिर गरम रहात होते. सकाळचे 10.00 वाजायला आलेत. आम्ही मागच्या तिन तासांपासून एकसारखे चालत होतो. माझ्या पाठीवरली बॅगमध्ये खाण्याचा सामान आणि दोन तीन पाण्याच्या बाटल्या असल्याने वजन जरा जास्तच होत. आणि अशातच एका उतारावर माझ्या उजव्या पायाच्या पोटरित जोराची कळ आली. वेदनेने मी विव्हळलो. पाय जमिनीवर टेकवत नव्हता. कसातरी रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसलो. सकाळपासून वेगाने चालण्याच्या नादात हव तेवढ पाणी पिणे झाले नव्हते. मला बसलेल पाहून सोबत चालणारे अभिषेक, दर्शन, सुजीत हे धावतच आले. 
पायात अशी कळ येणे हि ट्रेकिंग करतांना नेहमी घडणारी गोष्ट आहे. बर्याच वेळा शरिरातल पाणी आणि क्षार कमी झाल्याने हे घडत. अशा वेळी काय करावे हे सह्याद्रीतल्या ट्रेकमधून आम्ही शिकलो होतो. मी पटकन बॅगमध्ये होते तेवढे सर्व चॉकलेट खाऊन टाकले आणि सोबत बाटलीभर पाणी प्यालो. पाच मिनिटात पुन्हा एकदा ओके होउन चालायला लागलो. 
दुपारी एक वाजेपर्यंत आम्ही फार थकलो होतो. पोटात भुक मावत नव्हती. काही अंतरावर घर दिसायला लागलीत. आम्ही झपाटय़ाने पावल उचललीत आणि तिथे पोहचलो. समोर विस्तीर्ण दरि पसरली होती. दरिच्या मधोमध एक पुल होता. पुलाला लागूनच होते BSF चे चेक पोस्ट. समोर दोन हॉटेल्स होती. आमचा सर्व ग्रूप एकाच हाॅटेलवर मेहरबान झाला म्हणून आम्ही पाच सहा ट्रेकर्स दुसर्‍या हॉटेलात शिरलो. तीथे मोमोज आणि वाई वाई हा स्थानिक नूडल्सचा प्रकार सनकुन हानला. जेवनाचा डबा खाण्यात कुणालाही रस नव्हता कारण त्यात होती अर्धि शिजलेली बटाट्याची भाजी आणि तांदळाची पुरी. मागचे तीन दिवस तिन वेळेला आम्ही हेच पदार्थ खात होतो आणि त्याआधी रेल्वेच्या प्रवासात काहिंनी खराब होत नाही म्हणून बटाट्याचीच भाजी आणली होती.
जेवण आटोपून आम्ही पुन्हा एकदा बॅग्ज पाठीवर चाढविल्यात आणि चालायला तयार झालोत. काही पठ्ठे काही केल्या उठायचे नावच घेइनात. याला दोन कारण होती एक म्हणजे सकाळपासून चालल्याने बरेच जण थकले होते आणि दुसरे म्हणजे उतार संपुण पहाडावर चढनारी आमची वाट आम्हाला स्पष्ट दिसत होती. खरा कस लागणार होता तो इथे. काही मावळे प्रवासातच एवढे थकले होते की प्रत्यक्ष लढाईच्या वेळी त्यांनी नांग्याच टाकल्यात. आम्हाला काहीही करुन अंधार होण्याच्या आत मुक्कांमाच्या ठिकाणी पोहोचायचे होते. नाहितरी 'इस तरहके बिहडोमे सही हुनरके बिना आप एक रातभी जिंदा नही रेह सकते हे बेअर ग्रिल्सचे वाक्य आम्ही टवाळी म्हणून उच्चारतच होतो. शेवटी आमचा गाईड राजन याने अंधार पडण्याची दाखविलेली भिती कामी आली आणि ट्रेकिंगची केवळ बढाई मारणारे मावळे अखेर चढाईस तयार झाले. 
आता रस्ता तिव्र चढाचा होता आणि थोडे देखिल चालले तरी धाप लागत होती. मजल दरजल करत कासवाच्या गतीने आम्ही वर सरकू लागलो तस रान मोकळ होऊ लागल. आणि हिमालयातील निसर्गाच्या त्या चमत्कारिक नजार्यानी सकाळपासून बॅगेत असलेला कॅमेरा बाहेर काढण्यास भाग पाडले. दूरवर पसरलेल्या हिमालयातील पर्वत रांगा, पावसाळ्यातिल गवताप्रमाने दाटिने उगवलेल जंगल, त्याच जगलात अडकल्यासारखे भासणारे कापसाच्या बोळ्यासारखे शुभ्र ढघ, पहाडांवरुन वळण घेत उतरणार्‍या पायवाटा, ख्रिसमसट्रीच्या आकाराची उंचच उंच झाड सार काही स्वप्नवत. 
मग काय थकले भागले मावळे पुन्हा जोशात आले ना भाऊ. व्यावसायिक मॉडेललाही लाजवेल असले फोटोसेशन सुर झाले. आधि गाॅगल लावलेला, मग गॉगल लाउन टोपी घातलेला, मग गॉगल लाउन टोपी घालून मफ्लर गुंडाळलेला एक एक फोटो निघू लागला तर तिकडे महिला मंडळ सेल्फी काढण्यात मग्न 'आखीर सवाल प्रोफाईल पींचर का था मेरे भाई'. (यातुन मि देखील सुटलो नाही हे पुन्हा वेगळे सांगायला नको) 
दुपारी 4.00 वाजेच्या सुमारास अतिशय दाट धुक पडल. गारवाही चांगलाच जाणवू लागला. रस्ता काही केल्या संपत नव्हता. रस्त्यावरच पुढे एका वळणावर BSF चा कॅम्प दिसू लगला. आम्ही त्याच्यापुढे काही अंतर जाउन उभे राहिलो. तिथेच काही अंतरावर एक जवान उभा होता. त्याच्याशी बोलताना कळले की तो मुळचा उत्तर प्रदेशचा होता आणि येथे मागील तिन वर्षांपासून तैनात होता. या अतिशय निर्मनुष्य आणि दुर्गम ठिकाणी जिथे मोबाईलला रेंज नाही, करमणुकीचे कुठले साधन नाही आमच्यातले काही एका दिवसात वैतागले होते. तेथे हे जवान आपल्या परिवरापासुन वर्षानुवर्ष लांब राहुन खडा पहारा देत होते. हे सारे ऐकणे वाचणे आणि अनुभवने यात प्रचंड तफावत आहे. ज्या भावना त्या वेळी भारतीय सेनेप्रती वाटल्यात त्या शब्दातीत आहेत. 
आमच पाणी आणि खाद्यपदार्थ आता संपले होते. आम्ही अतिशय थकलो होतो आणि एक एक पाऊल पुढे टाकणेही कठीण झाले होते. त्यात दररोज चालण्याची सवय असलेले अजुन टिकून होते परंतु पहिल्यांदाच एवढे चालनार्याची अवस्था वाईट होती. काही मुलीनी तर 'कितना बाकी है, कितना बाकी है 'हे विचारून विचारून राजनला भंडाऊन सोडले होते. तरीही तो बिचारा बुद्धांच्या चेहर्‍यावरील शांत भावाने सांगत होता' बश थोडाशा बाकी है, थोडाशा'. 
आम्ही पुढे चालनार्यात होतो. काही ट्रेकर्स दोन किलोमीटर पर्यंत मागे राहिले होते. राजन त्यांच्यासाठी थांबला होता. जंगली फुलांनी बहरलेल एक वळन आम्ही ओलांडल आणि समोर पाउलाचा आकाराचा ठसा असावा तस पाण्याने काठोकाठ भरलेल तळ आम्हाला दिसल. त्याच्यात लगोरीसारखे दगडांचे थर रचून ठेवले होत आणि बैद्ध धर्मस्थळी आढळनारे रंगीत झेडेंं अवतीभवती लावले होते. हे तळ बुद्धांच्या पायाच्या ठस्याने निर्माण झाले आहे अशि स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. याच ठीकाणाला नेपाळी भाषेत काली म्हणजे काळ आणि पोखरी म्हणजे तळ म्हणतात. आमच्या मुक्कामाचे ठिकाण हे कालीपोखरीच होते म्हणजे नक्कीच येथे जवळपास वस्ती असणार होती. तेथून एक चढ चढुन लगेच दहा बारा लाकडी घरांच कालीपोखरी हे गाव दिसल. पोहचलो एकदाचे म्हणत आम्ही खुष झालोत. 
आजचा मुक्काम देखिल एका लाकडी घरातच होता. ताजेतवाने होउन आम्ही हॉलमध्ये चहा घेण्यासाठी जमलो. हॉल लहान असल्याने चहा कपात घेऊन आम्ही बाहेर आलो तर बाहेर लंख्ख सूर्यप्रकाश पसरला होता. पहाडांमध्ये क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण आम्ही अनुभवत होतो. दुरवरपर्यत क्षितिज दिसत होत आणि पश्चिमेला पहाडांच्यामागे सुर्य मावळत होता. सगळीकडे पिवळसर प्रकाश पसरला होता. एवढा सुंदर सुर्यास्त मी पहिल्यांदाच पहात होतो. 
शारिरीक श्रमानीं आणि तिव्र थंडीने आमच्यातले बरेच लोक आजारी पडले होते. काही शरीराने हरले होते तर काही मनाने. माझ्यासारखे काही मात्र तो प्रवास, ते ठिकाण, ती रात्र, ते चांदण, ती माणस याचां आनंद घेण्यात गुंतली होती. कारण आम्हाला ठाउक होत की हे दिवस अयुष्यातले अविस्मरणीय दिवस ठरणार आहेत.
रात्रीच्या 5 ते 6 अंश तापमानात बाहेर आम्ही शेकोटीच्या भवती बसलोत. सुजीत जवळ अगदि बेअर ग्रिल्सकडे असते तसेच 
एल्युमिनियमचे मोठे पात्र होते त्यात शेकोटिवर पाणी गरम करुन आम्ही लेमन टी बनवली आणि शेकोटीच्या भवतीच गाणी गात तिचा अस्वाद घेतला. 47 लोकांचा समूहात आताशा आमचे समविचारी लोकांचे उपसमूह तयार व्हायला लागले होते. रात्री झोपताना आजच्या दिवसभराचा थरार आठवत होतो आणि उत्सुकता होती उद्याच्या दिवसाची. कारण उद्या आम्ही पाहणार होतो Top of the world... *MOUNT EVEREST*

माझे ट्रेकानूभव...संदकफू डायरी...भाग दोन...

दिवस पहिला : दिनांक 16 मे या दिवशी पहाटे 4.30 लाच जाग आली. पिण्यासाठी गरम पाणी घ्यावे म्हणून बाहेर पडलो तर पहातो ते काय चंक्क उजाडल होत. आपण देशाच्या पश्चिम टोकाकडून पूर्वेकडील दार्जिलिंगला आलो आहोत आणि येथे सुर्य दोन तास आधी उगवतो तसेच मावळतो हे लक्षात यायला काही शेरलॉक होम्सच्या मेंदूची अवश्यकता नव्हती. सकाळी 6.00 वाजता आम्ही नाश्त्यासाठी हॉटेल मधिल वरच्या गॅलरीत जमलो. तेव्हा धुळेकर डॉ. चिंत्ते यांनी बोट दाखवून खिडकी बाहेर पहायला सांगितले. बाहेर पहातो ते काय अनेकदा लोकांच्या भिंतीवर फ्रेममध्ये पाहिलेल्या आणि मोबाईलवर वॉलपेपर म्हणून म्हणून ठेवलेल्या हिमाच्छादित पर्वत रांगा सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होत्या. हिमालयात स्नो लाईने ही 5700 मिटर्सच्या वर सुरू होते. म्हणजे आम्ही दार्जिलिंगच्या (2024 मीटर) वरुन अंदाजे 6000 मिरच्या वरील पर्वत रांगा पहात होतो. मी माझ्या अयुष्यात पहिल्यांदा हिमाच्छादित पर्वत पहात होतो. इयत्ता नववीत असत्तांना सहलिनिम्मित पहिल्यांदा अलिबागला समुद्र पाहीला होता तेव्हा जे वाटले होते अगदी तसेच आता जाणवले. अशावेळी मोबाईल फोनमध्ये कॅमेरा टाकन्याची आयडिया ज्या व्यक्तीला सुचली त्या महान व्यक्तीला मनोमन धंन्यवाद देउन ते नजारे पटकन टिपून घेतलेत.
नाश्ताकरतां आमच्या ट्रेकचे व्यवस्थापक कलकत्ता येथुन आलेले श्रिमनी सर याच्याशी परिचय झाला. त्यांचा एकंदर व्यक्तिमत्वावरुन हे पुर्वी कुणीतरी खतरु ट्रेकर असले पाहिजेत हे मी ताडले. अधिक चौकशी केल्यावर कळले की ते 1983 सालच्या भारतीय एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी सदस्य होते. एवढा परिचय त्यांची महती समजण्यासाठी पुरेसा होता. नाश्ताकरतां त्यांनी काही महत्त्वाच्या सुचना केल्यात, जसेकी शंक्य तेवढा भात खा, बटाटे खा, भरपूर पाणी प्या इत्यादी ज्यातून तुम्हाला कारबोहायड्रेट्स मिळेल आणि निर्जलिकरण होनार नाही. चहा हा बिनदुधाचा होता हे त्याच्या रंगावरून कळत होते हे पाहून मात्र आमच्या चेहर्‍यावरचा रंग उडाला. हे श्रिमनीनीं लगेच ओळखले ते म्हणाले Milk is bad for digestion in Mountains, try to drink Tea without milk. (आता त्याना कुठे ठाउक कि धुळ्याच्या गोपाल टि चा पिवर चहा काय असतो ते.)
सकाळी साधारणपणे 6.30 ला आम्ही दार्जिलिंग सोडून जीपने ट्रेक सुरू होनार होता त्या धोत्रे या गावाच्या मार्गाला लागलो. दुपारच्या जीवनाचे डबे वाटेत मिळालेत. दार्जिलिंग मागे पडले तसा रस्ता रहदारीमुक्त आणि सुंदर झाला. आजुबाजुला पसरलेल जंगल अधिक घनदाट झाल. आम्ही खर्या अर्थाने हिमालयाच्या कोअर रिजन मध्ये प्रवेश करत होतो. वळणावळणाच्या रस्त्यावर ड्रायव्हरच कौशल्य दिसत होत. गाड्या सुसाट सुटल्या होत्या. अचानक एका वळणावर गाडिचा वेग मंदावला आणि ड्रायव्हरने आम्हाला खिडकीतून बाहेर पाहण्यासाठी इशारा केला. पहातो तर काय बाहेर बिबटय़ाचि चार लहान पिल्ले एका चढावर चढण्याचा प्रयत्न करत होती. ते द्रुष्य पाहुन आम्ही गारच पडलोत. लोक जे बघण्यासाठी जंगल सफरीवर जातात ते आम्ही सहज रस्त्यावरच्या प्रवासात पहात होतो. हि आहे हिमालयाची महती. पिल्ले होती म्हणजेच त्यांची आई देखिल तिथेच असणार होती. गाडीच्या खिडकीतूनच आम्ही पटकन फोटो घेतलेत आणि वाटेला लागलोत. आपल्याला पुढे काय काय पहायला मिळेल या विचाराने सारेच प्रफुल्लित झाले होते.
दोन तासाचा दमवनारा प्रवास करून आम्ही धोत्रे या तिस पस्तीस घरांच्या गावी येउन पोहचलो. आमच्या सभोवताली ढग वेगाने वाहत होते. मध्येच पावसाची रिपरिप चालली होती. सर्व ट्रेकर्सचा हेडकाऊंट घेऊन काही सुचना देण्यात आल्या आणि सकाळी ठिक 9.30 ला आम्ही जंगलातून जाणारी दगडी पायवाट धरली. आम्हाला लिड करत होता राजन नावाचा तिस वर्षे वयाचा एक स्थानिक गाईड तसेच सर्वात मागे होते निमा, पासन आणि गोपाल हे सामान वाहुन नेणारे पोर्टर आणि जॉय सरकार नावाचा एक बंगाली केअर टेकर.
सुरवातीला नवे ट्रेक सुट घातलेले, गॉगल लावलेले, नवे कोरे ट्रेकिगचे शुज घातलेले नव्या दमाचे ट्रेकर्स अतिशय उत्साहात होते परंतु काही अंतर जातोनजातो तोच पावसाला सुरुवात झाली आणि आमचा वेग ओसरला. आम्ही पटकन रेनकोट, रेनशीट चाढवलेत आणि पायवाटेने चालू लागलो. पावसामुळे कॅमेरा काढता येत नव्हता तेव्हा शंक्य तितके फोटो मोबाईल मध्येच घेत होतो. सुजीत आणि मी सुरवातीपासूनच सर्वात पुढे राजन सोबत चालत होतो. पुढे चालण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला फोटोग्राफीसाठी वेळ मिळतो आणि निर्मनुष्य स्थळ देखिल मिळते शिवाय माणसाच्या गोगांटापासुन अंतर ठेवून चालल्याने प्राणी, पक्षी यांचे आवाज ऐकता येतात आणि चाहूल घेता येते.
आमच्यात आणि इतरात चालतांना बरेच अंतर पडल्याने राजन आम्हाला तिथेच थांबायला सांगुन ईतरांना घेण्यासाठी मागे फिरला. पाऊसही आता थांबला होता आम्ही रेनकोट वैगरे पुन्हा बॅग मधे ठेवलेत आणि कॅमेरा बाहेर काढला. कॅमेऱ्याची लेन्स कुठेही फिरवा तुम्हाला वॉलपेपर इमेज मिळनार एवढ सौंदर्य सभोवताली पसरलेल होत. कुठेही मानवी हस्तक्षेपाचे ठसे नव्हते. पायवाटेने बाजुलाच पडलेला पाचोळ्याचे जाडसर थर होते. पायवाट सोडली तर उघडी जमिन कुठेही नजरेस पडत नव्हती. शक्य तिथे दाटीवाटीने वनस्पती उगविल्या होत्या. काही व्रुक्ष तर भिती वाटावि एवढे प्रचंड मोठे झाले होते. त्यांच्या जाडसर फांद्यांवर शैवाळाचे थर साचले होते. हवेत प्रचंड गारवा होता. नुकत्याच झालेल्या पावसाने रान ओलसर झाल होत. मला अचानक महानोरांच्या ओळी आठवल्यात "चिंब पावसान रान झाल आबादानि, झाकू कशी पाठीवरली चादंनगोदनी बाई, बाई चादंनगोदनी'. संदिप खरेंच्या 'दूर दुर नभपार डोंगराच्या माथ्यावर, निळे निळे गार गार पावसाच्या घरदारातून' आम्ही चंक्क चालत होतो. चालत चालत आम्ही भारत आणि नेपाळ सिमेवर असलेल्या सिंगालिला नॅशनल पार्कच्या बफर झोनमध्ये प्रवेश केला होता.
काही वेळाने सर्वच ट्रेकर्स जमल्यावर एका मोकळ्या माळरानावर आम्ही जेवनासाठी आणि विश्रांतीसाठी थांबलो. कुठलाही आडोसा नसल्याने वाहसरप्राइज...
वरणभात, बटाट्याची भाजी आणि तांदळाच्या पुर्या. आम्ही नाक मुरडत जेवण आटोपले आणि पुन्हा एकदा वाटेला लागलो. थोडेच अंतर गेल्यावर जंगल संपल आणि मोकळा परिसर सुरू झाला. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रचंड धुक पडल आणि चालता चालता एका ठिकाणी ओळिने काही झेंडे गाडलेले दिसले. माझ्यातला शेरलॉक होम्स पुन्हा एकदा जागा झाला. आपण भारत आणि नेपाळच्या सिमेवर आहोत हे मी जाहीर करून टाकले जे नंतर चंक्क खरे निघाले. मग काय पासपोर्ट शिवाय आम्ही नेपाळच्या सिमेत प्रवेश केला (कारण तिथे कुठलाही बंदोबस्त नव्हता) आणि सिमेवर मनसोक्त फोटोसेशन करून धुमाकूळ घातला. पहिल्यांदाच अंतराष्टिय सिमा ओलांडतना उगाच उर वैगेरे भरून आले. तिथेच काही अंतरावरच आमचे मुक्कामाचे ठिकाण होते. आज रात्रीचा मुक्काम आम्ही नेपाळ मधिल टंम्बलिग या गावात करणार होतो.
एका तिनमजली लाकडी घरात आमच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यात सर्व पुरष मंडळी सर्वात वरिल झोपडीच्या आकाराच्या एका हॉलमध्ये थांबणार होती. मला ते ठिकाण प्रचंड आवडल रात्री जेवनात पुन्हा एकदा तोच बेत... वरण भात आणि बटाटे.
जेवन आटोपून आम्ही एका हॉलमध्ये बसलो तेव्हा त्या हॉटेल मालकाचा मुलगा गिटार वाजवतो हे आम्हस कळले. मग काय मैफील जमायला कितीसा वेळ लागणार. गिटारच्या पाश्र्वभूमीवर अर्जीत सिंग पासुन सुरु झालेली आमची मैफील भावगीत आणि गझलेच्या वाटेने थेट नेपाळी लोकसंगीतावर येउन थांबली. बाहेर प्रचंड गारवा आणि पाउस असतांना नेपाळ मधिल हिमालयातील त्या लाकडी घरात रंगलेली ती मैफिल सर्वासाठी मर्मबंधातली ठेव बनुन राहीली आहे.
रात्री उशिरा आम्ही झोपलो ते एक सुंदर दिवस संपवून दुसर्‍या थरारक दिवसाच्या प्रतिक्षेत. कारण उद्या येणार होता आमच्या ट्रेकचा सर्वात लांबचा मार्ग आणि खडतर दिवस....
ता वारा चांगलाच बोचत होता. चालून चालून थकलेल्या आणि सकाळपासून उपाशी असलेल्या सार्यानी वाटेत मिळालेले जेवणाचे डबे उघडलेत आणि गेस व्हाट...
*To be continued...*

माझे ट्रेकानूभव... संदकफू डायरी... भाग एक

काॅलेजला असतांना एकदा पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलवर सुजीत या मित्राच्या रुमला पॅरासाईट म्हणून राहण्याचा योग आला होता. तिथे काही मित्रांनी पुरंदरवरील ट्रेकिंगचा बेत आखला होता तेंव्हा सहज म्हणून आम्हीही त्या प्लॅनमध्ये सहभागी झालोत. अॉगस्ट महीण्यातील भर पावसातला तो ट्रेकिंगचा थरारक अनुभव माझ्या मनात खोलवर कोरला गेला. ट्रेकिंगची ती झिंग गेले आठ वर्षे झालीत काही उतरत नाहीये आणि यातच मग मी आणि सुजीतने मिळून सह्याद्रीतली अनेक ठिकाणे पिंजून काढली आहेत.
ज्याप्रमाणे गल्लीत क्रिकेट खेळणार प्रत्येक पोर हे भारताच्या टिमकडून खेळन्याच स्वप्न पहात अगदी त्याच सहजतेने सह्याद्रीत फिरणारे ट्रेकर्स हिमालयाच स्वप्न आपल्या उराशी बाळगून असतात. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील सर्वच ट्रेकर्ससाठी हिमालय हा स्वर्ग आहे. अवघ्या जगातले कितीतरी ट्रेकर्स नचुकता दरवर्षी हिमालयाची वारी करित असतात. किंबहुना हिमालय हा फक्त ट्रेकिंगसाठीच आहे हा (गैर) समज मी गेली कित्येक वर्षे बाळगून आहे.
हिमालयातल्या त्या भंव्य विस्तीर्ण रांगा, संपूर्ण देश आपल्या अंगावर वसवनारी त्याची व्याप्ती, जागतिक पहिल्या दहा मधिल नऊ शिखरे बाळगनारि त्याची उंची, त्याच्यावर आढळणारी जैवविविधता, गंगे सारख्या महानद्या निर्माण करणार्‍या त्याचा दरी आणि काश्मीर पासुन तिबेट पर्यंत सांस्कृतिक वैविध्यतेने त्याच्यावर राहणारी माणस या सार्याच्या प्रती मला प्रचंड आकर्षण आहे. कधीतरी हिमालयात जायला मिळाव हे स्वप्न मी देखील उराशी बाळगून होतो आणि 2017 चा उन्हाळा ही संधी आमच्यासाठी घेऊन आलाच.
"इतनी शिद्दतसे तुम्हे पानेकी कोशिश कि है के हरइक जरै ने मुझे तुमसे मिलाने की साजिश कि है" अगदी शाहरुख खानच्या या शेराची प्रचिती यावी तसे दर्शन या माझ्या मित्राचा अचानक एक दिवस फोन आला. Youth hostel association of India च्या धुळे युनिट च्या वतीने दार्जिलिंग नजिकच्या संदकफू या ठिकाणच्या ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. मग काय मागचा पुढचा विचार नकरता मी लगेचच हो म्हणालो आणि सुजीतला फोन केला तो तर माझ वाक्य संपण्याच्या आधीच हो म्हणाला. त्याच दिवशी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आम्ही लागलीच पैसे भरून टाकलेत आणि अतुरतेने वाट पाहू लागलो 13 मे 2017 या दिवसाची.
13 मे 2017 या दिवशी आमच्या 47 लोकांच्या टीमने कलकत्त्याला जाणारी शिर्डी हावडा ही रेल्वे गाठली आणि मनमाड रेल्वे स्थानकावरून आमची आगेकूच सुरू झाली. 28 तासाचा प्रवास करून आम्ही 14 मे ला रात्री 8.30ला हावडा स्टेशनला पोहचलो. तिथुन 18तासाचा लक्झरी बसने प्रवास करून सिलीगुडी हे ठिकाण गाठले आणि तेथून अंदाजे 75 किमी लांब असलेल्या दार्जिलिंच्या वाटेला लागलो. सिलीगुडी सोडताच आमच्या समोर उभा होता प्रचंड मोठा असा हिमालय. या पर्वतराजच्या
प्रथम दर्शनानेच सरकण अंगावर काटा आला. भूगोलात अभ्यासलेला, चित्रपटात पाहीलेला आणि NET GEO, DISCOVERY या वाहिनीवरून जवळपास रोजच भेटणारा हिमालय साक्षात माझ्या समोर उभा होता. जसजसा आमच्या गाडीने वळनावळनाचा घाटाचा रस्ता सुरू केला तसतसा तो पर्वतराज आपल्या पोटातली निसर्गसौंदर्याने नटलेली एक एक रत्ने बाहेर काढू लागला. प्रत्येक द्रूष्यागणिक गाडीतील मुली वॉव वॉव म्हणत चंक्क किंचाळूच लागल्यात. थोडक्यात कवठे बुद्रुक या गावाच्या बाहेर कधिही न गेलेल्या व्यक्तीला जर डायरेक्ट पॅरिसला नेले तर त्याचे जे काही होईल ते आमचे होत होते. संध्याकाळी 5.00 वाजेच्या सुमारास आमच्या गाडीच्या ड्रायव्हरने घाटातीलच एका लहानशा टुमदार हॉटेल बाहेर गाडी थांबवली. आम्ही आत जाऊन बसलो तिथे काही चेहर्‍यावरून स्थानिक वाटणारी मुल मोठ्या आवडिन पाढराशुभ्र सांजोरी सारखा दिसणारा पदार्थ मोठ्या आवडीने खात होते. आम्ही देखिल तोच पदार्थ मागविला. बारिक चिरलेली कोबी आणि कांदा यांच पुरण तांदळाच्या पुड मधे भरून उकडीच्या मोदकासारखा वाफवलेला त्या पदार्थाचे नाव होते 'मोमोज'. सकाळ पासून उपाशी असलेलो आम्ही तिन चार प्लेट मोमोज आणि पुरीभाजी खाऊन जेव्हा बिल द्यायला गेलोत तेव्हा हॉटेलची मालकीण ही 'हे नेमके अफ्रिकेच्या कुठल्याशा दुष्काळी देशातून आले असावेत' या अविर्भावात आमच्या कडे पाहत होती.
खान संपवून पुन्हा एकदा दार्जिलिंच्या वाटेवर लागलोत. काही अंतर गेल्यावर हिमालयाच्या उतारावर वसलेले कुरसांग हे गाव लागल जिथून रस्त्याच्या बरोबरीने जाणारा रेल्वे रूळ सुरू झाला आणि मला आठवल राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित आराधना चित्रपटातील किशोरदा यांनी गायलेले गित "मेरे सपनोकि रानी कब आयेगी तू" या गिताच याच मार्गाने चित्रिकरण झाले होते हे मी नेटवर वाचून सर्वांना सागितले ड्रायव्हरने देखिल होकार भरला आणि काही काळ ते गित चंक्क डोळ्यासमोर उभ राहील. दार्जिलिंग हे शहर आल तेव्हा जवळपास अंधार पडला होता या शहरात आमच स्वागत झाल ते ट्राफिक जॉमन. संपूर्णपणे पहाडावर वसलेले हे शहर सुंदर आहे परंतु पर्यटकांची आणि वाहनांची प्रमाणाबाहेर गर्दी या शहरात जाणवली. अतिशय उंंच्चावर वसलेल्या आमच्या 'सिल्व्हर कॅसटल' या हॉटेलात आम्ही पोहचलो तेव्हा रात्रीचे 9.00 वाजले होते. साधारणपणे 60 तासाचा दमवनारा प्रवास करून आम्ही येथे पोहचलो होतो. ऐन उन्हाळ्यातला तो 15 मे हा दिवस होता आणि दार्जिलिंग या ठिकाणी चक्क अंग गोठवनारी थंडी पडली होती. रात्री आम्ही पटकन जेवण करुन झोपण्यापूर्वी बॅग्स लावुन घेतल्या. जास्तीचा सामान येथेच सोडून आम्हाला अतिशय कमी कपडे आणि खाद्यपदार्थ घेऊन ट्रेकला निघायचे होते.
दुसर्‍या दिवशी सकाळी आमच्या ट्रेकची खरि सुरवात होणार होती. येणारे पाच दिवस आमच्या शरीराची कसोटी पाहणारे ठरणार होत. या पाच दिवसांत आम्हाला हिमालयाच्या जंगलातून दर्याखोर्यातून अंदाजे 50 किमी अंतर कापायचे होते आणि आम्ही पोहचणार होतो बंगाल मधिल सर्वात उंच ठिकाणी 'संदकफू' येथे. ज्याची उंची आहे 3636 मिटर्स म्हणजेच म्हणजेच कळसूबाई (1646)पेक्षा 2000 मिटर्स उंचीवर. आमच्यातले बरेच एवढ्या लांबच्या प्रवासाने थकले होते परंतु आमच्यातील कुणालाही माहीत नव्हते की उद्यापासून अतिशय थकविनारा, अंत पाहणारा परंतु तेवढाच जिवंत आणि थरारक अनुभव आमची वाट पाहत उभा आहे...
*To Be Continued...*

मुक्तछंद ...आठवण महान गायिकेची ...

ही घटना 1940 सालची आहे. लहानपणीच आपल्या मातापित्यांच्या म्रूत्यूमुळे अनाथ झालेला एक 14 वर्षे वयाचा कर्नाटक राज्यातील एका लहानशा खेडेगावातील मुलगा बगळूर या शहरात शिक्षण घेत होता. गरिबीची परिस्थिती असल्याने तो दिवसभर वाचनालयातच बसुन अभ्यास करायचा आणी रात्री उशिरा वसतीगृहात झोपायला जायचा. त्याच्या शिक्षकांनी त्याची बुद्धीमत्ता आणि हलाखीची परिस्थिती पाहून त्याच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था वार पद्धतीने केली होती. तो सोमवार ते शनिवार प्रत्येक शिक्षकांकडे आठवड्यात एकदा याप्रमाणे रात्री जेवण घ्यायला जायचा आणि रविवारचा दिवस बाहेर काहीतरी खाऊन घालवायचा.
तो असाच एकदा सोमवारी रात्री जेवणासाठी जात असतांना एका माडीवरून त्याला गायनाचे स्वर ऐकू आले. त्या जादुई स्वरांनी तो मुलगा आकर्षित झाला आणि एका घराच्या माडीवर चाललेल्या त्या गायनाच्या मैफिलीत जाऊन बसला.मंध्यम वयाची एक तयार गायिका अतिशय तन्मयतेने भान हरपून शास्त्रीय संगीतातील रागदारी गात होती. सार्या दुनियेला विसरून, डोळे मिटून ती जादुई स्वरांची गायिका आपल्याच धुंदीत गात होती. सर्व मैफील देखिल स्वरांच्या त्या आविष्कारांत तल्लीन झाली होती. त्या गायिकेच गाण ऐकून या 14 वर्षे वयाच्या मुलाच्या डोळ्यातून टपटप करत अश्रू वाहू लागलेत. जणूकाही त्याच्या मनातला कितीतरी वर्षांपासूनचा भावनांचा बांध या स्वरातून फुटला होता. तो मुलगा काल रविवार असल्याने जेवला नव्हता आणि आज सोमवारी केवळ दिवसातून एकदाच मिळनार रात्रीच जेवण देखिल या मैफीलीपाई घालवून बसला होता. मैफील संपली तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. मुलगा उठला त्याने त्या गायिकेच नाव एकाला विचारल आणी माडीवरून खाली उतरून एकटाच वसतिगृहाच्या दिशेने चालू लागला. भुक त्याच्या पोटात मावत नव्हती परंतु कितीही रुचकर अंन्न खाल्ले तरी मिळनार नाही अशा समाधानाने त्याचे मन भरून पावले होते.
पुढे अनेक वर्षे उलटलीत तो मुलगा मोठा होऊन एक प्रतिथयश लेखक झाला. आपल्या बालपणीच्या या प्रसंगाला आपल्या आत्मचरित्रात मांडताना तो लेखक म्हणाला "त्या रात्री मी मैफिलीत रडत होतो कारण मला असे वाटले की माझी मेलेली आई माझ्यासाठी गात आहे". एवढा उत्कट तो स्वर अविष्कार होता.
तो मुलगा म्हणजे भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यीक *एस. एल. भैरंप्पा* हे होत आणि त्या रात्री मैफीलीत गाणार्‍या त्या गायिका होत्या *गंगूबाई हनगळ* ज्याचीं 21जुलै या  दिवशी पुण्यतिथी असते 

.
अशा या महान गायिकेला कोटी कोटी प्रणाम

महायुद्धांच्या चित्रकृती भाग १ : ... *शिंडलर्स लिस्ट*

मानवी सभ्यतेच्या इतिहासातील सर्वात असंभ्य घटना म्हणून दुसर्‍या महायुद्धाचा उल्लेख केला जातो. 1939 ते 1945 दरम्यान लढल्या गेलेल्या या युद्धात सहा कोटींहून अधिक लोक मारले गेले होते. जगाचा इतिहास, भूगोल, अर्थकारण, राजकारण, समाजकारण बदलून टाकणार्‍या या घटनेचा कलाक्षेत्रावर प्रचंड प्रभाव पहायला मिळतो. कुठल्याही संवेदनशील कलाकारास हलवुन टाकणार्‍या या घटनेचे पडसाद साहित्य, चित्रकला, चित्रपट, नाटक या कलामांध्यमातून आजपर्यंत उमटत आलेले आपल्याला आढळतात. या लेखामालेतून दुसर्‍या महायुद्धावर आधारित काही लक्षवेधी चित्रपटांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण करनार आहोत.
*महायुद्धाच्या चित्रक्रूती भाग एक - शिंडलर्स लिस्ट*
जागतीक सिनेमातल आजच्या घडिच सर्वात महत्वाच नाव कुठल असा प्रश्न विचारला गेला तर बहुतेकांच उत्तर असेल 'स्टीव्हन स्पिलबर्ग'. गेल्या पाच दशकांपासून या प्रतिभावान दिग्दर्शकाने जागतिक सिनेमावर आपल निर्विवाद वर्चस्व गाजवल आहे. स्पिलबर्ग हा कुठल्याही पठडीतला दिग्दर्शक नाही. त्याला क्लासिक फिल्म मेकर म्हणाव तर त्याने गल्लाभरू 'इंडियाना जोन्स' आणि 'ज्युरासीक पार्क' सारखे सिनेमा बनवले आहेत. त्याला सायन्स फिक्शनवाला दिग्दर्शक म्हणाव तर त्याचे 'म्युनिच' आणि 'लिंकन' सारखे वास्तववादी सिनेमा हा भ्रम मोडून काढतात. त्याला लार्जर दॅन लाइफ चित्रपटांचा बादशहा म्हणाव तर 'द टर्मिनल' सारखा साधा, सरळ, सुंदर चित्रपटही त्याने बनविला आहे. थोडक्यात स्पिलबर्ग हा प्रचंड मोठी रेंज असलेला तल्लख बुद्धीचा प्रतिभावान दिग्दर्शक आहे. एकाच वेळी त्याच्या कलाकृती या व्यावसायिक असतात आणि प्रायोगिक सुद्धा. अशा या महान दिग्दर्शकाचा सगळ्यात महत्वाचा सिनेमा म्हणून 'शिंडलर्स लिस्ट' या चित्रपटाच नाव घेतले जाते.
दुसर्‍या महायुद्धात नाझी सैनिकांनी वंशद्वेशाच्या विखारी विचारातून जर्मनीतील ज्यू नागरिकांच मोठ्या प्रमाणात शिरकाण केल होत. ज्यू लोकांना संपविण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध अशा छळछावण्याची निर्मिती केली गेली. काही फार थोडे सुदैवी ज्यू कैदी या छावण्यातून वाचले होते. 'शिंडलर्स लिस्ट' हा चित्रपट नाझी छळछावण्यातून अतिशय रोमहर्षक पद्धतीने वाचविण्यात आलेल्या काही ज्यू कैद्यांची कथा सागनांरा चित्रपट आहे जो बेतलेला आहे 'आॉस्कर शिंडलर्स' या मुळच्या जर्मन व्यापाऱ्याच्या औदार्यच्या, करूणेच्या आणि माणसांचे प्राण वाचविण्यात आपल सर्वस्व गमावन्यासाठी तयार होणार्‍या मानसिकतेच्या प्रवासावर. या चित्रपटाचा दिग्दर्शक स्पीलबर्ग स्वतः जन्माने ज्यू असल्याने कदाचित ज्यू लोकांच्या जगण्यातली अगतिकता तो प्रभावीपणे दाखवू शकला असेल.
'शिंडलर्स लिस्ट' हा चित्रपट बेतलेला आहे तो लेखक 'थॉमस केनेली' लिखित 'शिंडलर्स आर्क' या 1982 सालच्या बुकर पारितोषिक विजेत्या कादंबरीवर. 30 नोव्हेंबर 1993 या दिवशी हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित झाला आणि काही समीक्षकांनी हॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात श्रेष्ठ चित्रपट हा किताबच या चित्रपटाला देउन टाकला. 1994 सालच्या आॉस्कर पुरस्कारातील तब्बल सहा पुरस्कार या चित्रपटाने आपल्या नावे केलेत.
1960 सालानंतर ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांचा काळ संपुन रंगीत चित्रपटांचा काळ सुरू झाला परंतु स्पिलबर्ग याने हा संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट माध्यमातूनच चित्रीत केला आहे. हे माध्यम चित्रपटाचा काळ अधिक प्रभावीपणे उभे करते आणि ब्लॅक अँड व्हाईट हे रंग प्रातिनिधिक स्वरूपात चित्रपटातल्या दोन व्यक्तिरेखा प्रभावीपणे उभ्या करतात. त्यातल्या एक 'आॉस्कर शिंडलर्स' (लियन निसन) हा सर्वस्व गमाउन ज्यू नागरिकांचे प्राण वाचवणारा व्यापारी तर दुसरा ज्यू नागरिकांना हाल हाल करून मारणारा क्रूरकर्मा जर्मन कमांडर 'अमन गोयथ' (राल्फ फिनेस). या दोघही कसदार अभिनेत्याचा सोबत महात्मा गांधींच्या भूमिकेसाठी आॉस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या 'बेन किंग्जले' याने 'आयझॅक स्टर्न' या अंत्यत सेवाभावी आणि सोशिक ज्यू व्यक्तीची भुमिका प्रभावीपणे साकारली आहे.
दुसरे महायुद्ध हे जरी जगावर आर्थिक आरिष्ट्य घेऊन आले तरी ती अनेक भाडवलखोरांसाठी प्रचंड नफा कमावण्यासाठीची एक संधी होती. हिच संधी साधण्यासाठी 'आॉस्कर शिंडलर्स' हा विषयासक्त, व्यसनी, स्वच्छंदी नफेखोर एक भांड्याची फॅक्टरी निर्माण करण्याचा निर्णय घेतो कारण त्या फॅक्टरीत राबण्यासाठी त्याला नाममात्र दराने ज्यू कैदी उपलब्ध असतात. सोबतीला हवी ती सवलत प्राप्त करून घेण्यासाठी सोबत असते ती जर्मन कमांडर 'अमन गोयथ' याची परंतु हळू हळू ज्यू नागरिकांवर होणारा अनन्वित अत्याचार पाहून 'आॉस्कर शिंडलर्स' मधला माणूस जागा होत जातो. सुरवातीला नाझी विचारसरणीचा पुरस्कर्ता हा व्यापारी किड्यामुग्यांसारख माणसाना मरतांना पाहून प्रचंड अस्वस्थ होतो आणि 1100 ज्यू नागरिकांना वाचविण्यासाठी आपली सर्व संपत्ती गमावतो.'एडगर रॅमिरेस' या पत्रकार अभिनेत्याच एक सुंदर वाक्य आहे. "For me no ideological or political convection would justify the sacrifice of human life. The value of human life is absolute with no concession. it's not negotiable." आॉस्कर शिंडलर्स पुर्णपणे या मानसिकतेचा पाईक होतो आणि हेच मानविमुल्य या चित्रपटाचा गाभा आहे.
दुसरीकडे 'अमन गोयथ' हा जर्मन कमांडर निव्वळ वेळ जात नाही म्हणून देखील आपापल्या कामात व्यस्त ज्यू नागरिकांना बंदुकीचा नेम धरून ठार मारण्याची मानसिकता बाळगनारा असतो. या कमांडर मधली माणुसकी जगन्याचा केविलवाणा प्रयत्न करते परंतु ज्यू बंद्दलचा कमालीचा द्वेष त्या माणुसकीला अधिक वाढू देत नाही.
चित्रपटातील काही प्रसंग भयानकपणे अंगावर येतात. खासकरुन 1943 मधे गोयथ हा गेटो या शहरात जमलेल्या हजारो ज्यूंच शिरकाण करण्यचा आदेश देतो. शिंडलर्स उंच टेकडीवरून आपल्या मैत्रीणीसोबत हा प्रसंग पहात असतो. कुत्र्यांच भुंकण, सैरावैरा धावणारे, तळघरात, माळावर लपलेले ज्यू महिला, बालक, पुरुष आणि त्यांना टिपून मारणारे नाझी सैनिक. या सर्व धावपळीत संपूर्ण ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटात ताबुंस रंगाचा झगा घालून धावणारी चिमुकली आणि हा नरसंहार संपतो तेव्हा एका गाडीतील प्रेताच्या ढिगातून डोकावनारा तो तांबूस रंगाचा झगा.
असाच एक प्रसंग चित्रपटाच्या शेवटी येतो जेव्हा ज्यू महिलांना घेऊन जाणारी एक आगगाडी रस्ता चुकून बर्फाळ प्रदेशातील एका छळछावणित पोहचते. जेथून धुरांचे प्रचंड काळे लोट बाहेर पडत असतात. तिथे पोहोचताच सगळ्या स्त्रियांचे केस कापले जातात आणि नग्न अवस्थेत एका मोठ्या कंपार्टमेंटमधे त्यांना सोडले जाते. आता आपल्याला गॅस चेंबरमध्ये नेऊन मारणार हा अंदाज आलेल्या केविलवाण्या स्त्रिया मोठमोठ्याने ओरडत असतात एकदुसरीला बिलगत असतात आणि अशातच विज जाऊन काळोख होतो. काही क्षण रक्त गोठवनारी शांतता पसरते आणि अचानक विषारी गॅस येनार अशि भिती असलेल्या स्त्रियांवर पाण्याचा फवारा येउन बरसतो. म्रूत्यू च्या तोंडातून त्या स्त्रीया परतलेल्या असतात कारण तिथे आॉस्कर शिंडलर्स पोहोचलेला असतो आणि नाझी सैनिकांवर त्वेषाने ओरडत असतो "They are my people... They are my people..." पहाणार्‍याचा काळजाचा ठोका चुकवनारे असे प्रसंग हि स्पिलबर्गच्या चित्रपटांची खासियत आहे..
हा संपूर्ण चित्रपट प्रेक्षक एक प्रकारची अस्वस्थता घेऊन पाहत असतात आणि हि अस्वस्थता चित्रपट संपल्यावरही संपत नाही आणि इथेच चित्रपट यशस्वी ठरतो. चित्रपटाचे शिर्षक 'शिंडलर्स लिस्ट' म्हणजे आॉस्कर शिंडलर्स आणि आयझॅक स्टर्न यानी मिळुन तयार केलेली ज्या ज्यू चे कामगार म्हणून नियुक्ती करून प्राण वाचवायचे आहेत ती यादी आहे. या यादीत नाव असन म्हनजे जगन आणि नसन म्हणजे मरण एवढ महत्त्व ज्यू नागरिकांना या यादिचे आहे. 'शिंडलर्स लिस्ट' हा चित्रपट अंतरिक हाकेला साद घालून माणसाच्या सहजप्रेरणेने जगण्याची गोष्ट आहे. युद्ध आणि शांती, द्वेष आणि प्रेम, क्रैय आणि करूना यांच्यातील युगानुयुगे चालत आलेल्या संघर्षाची गोष्ट सागनांरा आवर्जुन पहावा असा चित्रपट म्हणजे
*शिंडलर्स लिस्ट*
संकल्पना : विनय पाटिल,, धुळे

लता... मेरी आवाज ही पहचान है

 मेरी आवाज ही पहचान है... विनय पाटील स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे भय इथले संपत नाही...